👁 18 Views

आळंदी ते पंढरपूर 58 तास पायी प्रवास करीत 245 किलोमीटरचे अंतर पार करीत युवक पंढरीत दाखल

विक्रम शिरसट मित्र मंडळाच्या वतीने सत्कार
 लिम्का बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये होणार नोंद 
आषाढी यात्रा सोहळ्यासाठी विठु नामाचा गजर करीत देहू-आळंदीहून पालखी सोहळा रवाना होतो हा 245 किलोमीटरचा मार्ग भक्तीमार्ग होतो.याच रस्त्यावरुन आपण हरिनामाचा गजर करीत विक्रमी वेळेत पंढरीत पोहोचायचे असा दृढ निश्‍चय करीत चार युवक 23 जुन रोजी माऊलीच्या समाधीवर डोके टेकवून पंढरीच्या दिशेने रवाना झाले.आणि आज विश्रांतीचा अल्प कालावधी वगळता 58 तासांचा पायी प्रवास करीत हे युवक आज पंढरीच्या सीमेवर दाखल झाल्याचे समजताच येथील विक्रम शिरसट मित्र मंडळाने फटाके फोडून व पेढे वाटून त्यांचे स्वागत केले तर नगरसेवक विक्रम शिरसट यांच्या हस्ते त्यांचा सत्कार केला.
 प्रजीत परदेशी(रा.लोणंद),धनाजी पन्हाळे(रा.उस्मानाबाद),पारस पांचाळ(गुजरात),जयप्रकाश गुप्ता(रा.यवतमाळ) हे चार युवक आळंदी ते पंढरपूर हे 245 कि.मीचे अंतर विक्रमी वेळेत पार करुन लिम्का बुक ऍाफ रेकॉर्ड मध्ये नोंद करण्याचा निश्‍चत करुन 23 जून रोजी पंढरीकडे रवाना झाले होते.विश्रांतीचा अल्प कालावधी वगळता परिक्षकाद्वारे वेळ मोजली जात होती.परिक्षक म्हणून भारतीय वायुदलात सेवा बजावून निवृत्त झालेले जयंत डोफे हे त्यांच्या समवेत या प्रवासात सहभागी झाले होते.
     हे युवक आज पंढरीत दाखल होणार असल्याचे समजताच येथील विक्रम शिरसट मित्रमंडळाच्या वतीने यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी सिध्दीविनायक विरदे,गजेंद्र परदेशी,शिवाजी तारापूरकर,सुरज जाधव,प्रसाद कोळी,अमर घाटे,निलेश परचंडे आदींसह विक्रम शिरसट मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *