👁 11 Views

विवेक प्राथमिक विद्यालयाची आषाढी दिंडी उत्साहात

पंढरपूर Live
                    पंढरपूर येथील विवेक प्राथमिक विद्यालयाची आषाढी वारीची बालदिंडी उत्साहात निघाली होती.
सर्व विध्यार्थ्यानी विठ्ठल रुक्मिणी व विविध देव-देवतांचा आकर्षक वेशभूषा केल्या होत्या.
शाळेच्या मैदानापासून निघालेली हि दिंडी प्रदक्षिणा मार्गाने जाऊन विठ्ठल मंदिरास प्रदक्षिणा घालून संपन्न झाली. दिंडीमध्ये शिशु वर्ग व इयत्ता पहिली ते चौथीचे विध्यार्थी सहभागी झाले होते.

                   विवेक प्राथमिक विद्यालयाच्या बालदिंडीचे दरवर्षी प्रमाणे सर्वानाच आकर्षण असते.
ज्ञानोबा माऊली, जय जय रामकृष्णहरी, भजन व अभंग म्हणत विध्यार्थी व शिक्षक या दिंडीत सहभागी झाले होते.
ठिकठिकाणी दिंडीतील बाल विठ्ठल-रुक्मिणीचे व देवदेवतांचे दर्शन घेत होते. पंढरपूरच्या येणाऱ्या भाविकांचे स्वागत या बाल दिंडीने केले. हि दिंडी यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व पालकांनी सहकार्य केले.

 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *