👁 10 Views

बृहन्मुंबई हद्दीत 21 जुलैपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी

मुंबईदि. 27 : बृहन्मुंबई हद्दीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम1951 च्या कलम 37 (1) (2),कलम 2 (6) आणि कलम 10 (2) नुसार बृहन्मुंबई हद्दीत 21 जुलै 2017 पर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी करण्यात आला आहे.
            या आदेशानुसार नागरिकांना शस्त्रसोटेतलवारीभाले,परवानेरहित बंदुकासुऱ्याकाठ्या- लाठ्या किंवा शरीरास इजा करण्याकरिता वापरता येईल अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणेदगड किंवा अस्त्रसोडावयाची अस्त्रेफेकावयाची हत्यारे, अग्नीशस्त्रे किंवा साधने सोबत बाळगणेजमा किंवा तयार करणेकोणतेही दाहक पदार्थ किंवा स्फोटक पदार्थ बाळगणेव्यक्तीची अगर प्रेते किंवा त्याच्या प्रतिमांचे प्रदर्शन करणेसार्वजनिक रितीने घोषणा करणेगाणी म्हणणे किंवा वाद्य वाजविणेसभ्यता अगर नितीविरुद्ध असतील अशी किंवा राज्याची शांतता धोक्यात येईल अशी भाषणेहावभाव करणेसोंग आणणे अशी चित्रे – चिन्हेफलक अगर इतर कोणताही जिन्नस किंवा वस्तू तयार करणे किंवा त्यांचा लोकांमध्ये प्रसार करणे अशा बाबी करण्यास मनाई करण्यात आली आहे. या मनाई आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.
                शासकीयनिमशासकीय किंवा सार्वजनिक उपक्रमामध्ये सेवा बजावत असताना कर्तव्याच्या स्वरुपामुळे वरील शस्त्रे बाळगणे आवश्यक असणाऱ्या व्यक्तींना हा आदेश लागू असणार नाही. खाजगी सुरक्षा रक्षकगुरखाचौकीदार आदींना साडेतीन फूट लांबीपर्यंतची लाठी बाळगण्यास मनाई असणार नाहीअसेही बृहन्मुंबई पोलीस उपआयुक्त (ऑपरेशन्स) यांच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.
 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *