👁 10 Views

सर्वात मोठी लोकशाही असलेल्या देशात विकासात्मक योजना राबविण्यात शासन यशस्वी -विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे

मुंबई, दि. 27 : जगातील सर्वात मोठी लोकशाही आणि 100 कोटीपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या देशाच्या विकासासाठी शासन सक्रीय आहे. देशात व राज्यात कामगारमहिला व बालविकासऊर्जा प्रश्नपाणी आदी प्रश्नासंदर्भात विविध योजना यशस्वीरित्या राबविल्या असल्याचे विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांनी आज येथे सांगितले.
विधानभवनात ऑस्ट्रेलियाच्या कामगार पक्षाचे प्रतिनिधी व सल्लागार संसदीय शिष्टमंडळाने विधिमंडळाच्या पिठासीन अधिका-यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी श्री. बागडे हे बोलत होते. यावेळी प्रधान सचिव डॉ. अनंत कळसेआमदार कॅप्टन आर. तलीम सेल्वनअध्यक्षांचे सचिव सागर कुमारशिष्टमंडळात विधानसभा सदस्य सॅली टालबोट,मेंबर ऑफ पार्लामेंट मॅडलीन ओजील्वी,  विधानसभेचे सदस्य कॅट वॉर्डन,राष्ट्रीय कामगार संघटनेचे गॅरी मासपलानी थिवरजेनीफर लाईटब्रीट मार्यनिकविकी ब्युरोअबी राजकुमार आदी ऑस्टेलियाचे अधिकारी उपस्थित होते.
श्री.बागडे यांनी कामगारशेतीनिवडणूक या विषयाचा अभ्यास करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियन शिष्टमंडळाला राज्याच्या शासकीय आणि विधीमंडळ कामकाजासंदर्भात माहिती दिली. ते म्हणाले कीभारत जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश आहे. ऑस्ट्रेलियाच्या तुलनेने देशाची लोकसंख्या जास्त असून,  शिस्त आणि स्वच्छतेबाबत शासन प्रयत्नशील आहे. त्यासाठी स्वच्छता अभियान देशभर यशस्वीरित्या राबविण्यात येत आहे. या देशाला हजारो वर्षाची पंरपरा आणि संस्कृती लाभली असूनसहकाराची भावना लोकांच्या मनात रूजली आहे आणि त्यामुळेच लोकशाही समृध्द झाली असल्याचेही श्री. बागडे यांनी यावेळी सांगितले.
 बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *