👁 9 Views

बोगस डॉक्टरांकडून भाविकाचा जिव गेल्यास आधिकार्यांवर 302 गुन्हा नोंदवावा -निलेश माने

बोगस डॉक्टरांकडून भाविकाचा जिव गेल्यास आधिकार्यांवर 302 गुन्हा नोंदवावा 


वरील विषयान्वये शहराध्यक्ष निलेश माने यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकामध्ये व्यक्त केली आहे की,


वरील विषयानव्ये प्रांतअधिकारी, जिल्हाधिकारी,मुख्याधिकारी यांना १२/०५/२०१७ रोजी निवेदनाद्वारे विनंती करण्यात आली होती की, पंढरपुर शहरातील गोविंदपूरा खिस्ते गल्ली (डोळे वाडा) येथे सवनुर नावाच्या डॉक्टराने वैद्यकीय सेवेचा अवैधरित्याने आपला व्यवसाय सुरूच ठेवला आहे. याच बरोबर मटन मार्केट जवळ जुन्या कोर्टा समोर बिल्बकुमार या नावाच्या डोक्टराने आपला अवैधरित्या व्यवसाय सुरूच आहे.


  या दोन्ही डोक्टरांकडे महाराष्ट्र कौन्सील ऑफ इंडियन मेडिसीन यांची मान्यता नसून ही राजसोपने हे वैधकिय व्यवसाय उघडून बसलेत.






 बोगस डॉक्टर आहेत का नाही? यांची चौकशी केलि का नाही हे विचारन्यास मी उपजिल्हा रुग्णालय येथे शेळके मैडम ची भेट घेतल्यास ते म्हणाले आम्ही सिव्हील सर्जनला माहिती पाठवली आहे. पण आम्ही ऐक्शन घेऊ शकत नाही. हे सिव्हील सर्जनच काम आहे आसे सांगितले. मी सिव्हील सर्जन ला पट्टनशेट्टी यांना कॉल केला तर ते म्हणाले हां विषय आमच्या कडे येत नाही तालुका कडे येतो. तालुक्याचे बोधले यांना कॉल केला आसता ते म्हणाले आमचा ही संबध येत नाही हां शहर मध्ये आहे पंढरपुर नगरपालिकातील आरोग्यअधिकारी यांच्या कडे येतो. मी आरोग्य अधिकारी संग्राम गायकवाड यांना कॉल केला आसता ते म्हणाले आम्ही कागदपत्रे तालुक्याचे बोधले यांना पाठवले आहेत आम्ही एक्शन घेउ शकत नाही. D.H.O हे एक्शन घेउ शकतात. मी D.H.O शितल कुमार यांना कॉल केला ते पण तेच बोलले की आम्ही एंटर फियर करू शकत नाही आमचा विषय नाही हां शहरचा विषय आहे नगरपालिके कडे येतो. मी शेवट नगरपालिकेचे C.O बापट साहेबांना कॉल केला तर त्यांनीही अंग काढून घेतले ते म्हणाले माझ्या फेमिली मध्ये दोन डोक्टर आहेत म्हणून मला चांगलच माहीत आहे की हां विषय नगरपालिकेचा नाही व संबध नाही.

    पंढरपुर हे तिर्थशेत्र आसून आषाढ़ी वारीची गर्दी पंढरीत दाखल होत आहे. जर एकाद्या भाविकाचा या डॉक्टरांनकडून जिव गेलाचतर या अधिकार्यां पैकी कोणता अधिकारी जबाबदारी घेणार?

 शहराध्यक्ष निलेश माने यांनी प्रसिद्धीस पत्रकात निवेनद्वारे सांगितले आहे. जर भाविकाचा जिव गेलास तर कोणत्या अधिकार्या कडे तपास होता हे पाहून त्या अधिकार्यावर ३०२ प्रमाने गुन्हा नोंदवावा आशी मागणी शहराध्यक्ष निलेश माने यांनी केली आहे.





सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *