👁 10 Views

बसमधील सेक्स व्हिडीओप्रकरणी ड्रायव्हर, क्लिनरला अटक

चंद्रपूर: ट्रॅव्हल्समध्ये भाजप नेत्याने केलेल्या अश्लील कृत्याप्रकरणी चंद्रपुरातील नागभिड पोलिसांनी नवी कारवाई केली आहे.  पोलिसांनी बसचालक, क्लिनर आणि हेल्परला अटक केली आहे. बसमधील सीसीटीव्ही फुटेज व्हायरल केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.
बसचालक शारंगधर रामटेके, क्लिनर राकेश खोब्रागडे, हेल्पर नितीन सहारे या तिघांना अटक झाली आहे.
यापूर्वी भाजप सरचिटणीस रवींद्र बावनथडे याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन, त्याला अटक करण्यात आली आहे.
काय आहे प्रकरण?
बावनथडे आणि एक तरुणी 27 जूनला नागपूरवरुन नागभिडकडे जाणाऱ्या ट्रॅव्हल्समधून प्रवास करत होते. या बसमध्येच त्याने तरुणीशी शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचं व्हायरल व्हिडीओमध्ये दिसून येतं.
ट्रॅव्हल्समधील सीसीटीव्हीमध्ये हा सर्व प्रकार कैद झाला. त्यानंतर  हा व्हिडीओ व्हॉट्सअपवर व्हायरल झाला आहे.
धक्कादायक म्हणजे या बसमध्ये अनेक प्रवासी असूनही, बावनथडे शारीरिक संबंध करत असल्याचं या व्हिडीओत स्पष्ट दिसतं.
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर संबंधित तरुणीने पोलिस स्टेशन गाठून तिने बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली. बावनथडेने नोकरीचं आणि लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप तिने केला आहे.
दरम्यान, हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे.
कोण आहे रवींद्र बावनथडे?
वयाची पन्नाशी गाठलेला रवींद्र बावनथडे हा भारतीय जनता पक्षाचा जुना कार्यकर्ता असून, सध्या भाजपचा गडचिरोली जिल्हा सरचिटणीस आहे. आरमोरी विधानसभा क्षेत्रप्रमुख म्हणूनही तो कार्यरत आहे. बावनथडे हा आरमोरी तालुक्यातील वासाळा येथील कर्मवीर विद्यालयात शिक्षक होता.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

  






























































































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *