👁 7 Views

धमक्यांना घाबरुन कुणालाही प्रदर्शनापूर्वी दाखवणार नाही ‘इंदू सरकार’, मधुर भांडारकरांची भूमिका

मुंबईः दिग्दर्शक मधुर भांडारकर यांचा ‘इंदू सरकार’ हा सिनेमा रिलीजपूर्वीच वादाच्या भोव-यात सापडला आहे. आणीबाणीवर आधारित या सिनेमात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्या भूमिका दाखवण्यात आल्याने काँग्रेसने आक्षेप घेण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसचे मुंबई अध्यक्ष संजय निरुपम यांनी सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांना पत्र लिहिलं आहे. पत्रातून त्यांनी चित्रपट रिलीज होण्याआधी आम्हाला दाखवण्यात यावा अशी मागणी केली आहे. शिवाय सोशल मीडियावरुनसुद्धा मधुर भांडारकर यांच्यावर टीका केली जात आहे. ‘इंदू सरकार’च्या दिग्दर्शकाच्या चेह-याला काळे फासा आणि एक लाख रुपये घेऊन जा.. अशा आशयाचे ट्विट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे.
‘इंदू सरकार’ प्रदर्शनाआधी कुणालाही दाखवणार नाही – मधुर भांडारकर
यावर मधुर भांडारकर यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. प्रदर्शनाआधी मी इंदू सरकार कुणालाही दाखवणार नाही. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरुन लोक मला धमकावत आहेत, मला काळे फासण्याचे बोलत आहेत, हे अतिशय चुकीचे आहे, असे मधुर यांनी म्हटले आहे.
पुढे वाचा, संजय निरुपम यांनी काय म्हटले पत्रात…

संजय निरुपम यांनी काय म्हटले पत्रात…

संजय निरुपम यांनी पत्रात लिहिले आहे, ‘भरत शाह दिग्दर्शित आणि मधुर भांडारकर यांनी दिग्दर्शित केलेल्या इंदू सरकार सिनेमाबद्दल बोलायचं आहे. ट्रेलरनुसार सिनेमा आणीबाणीवर आधारित असल्याचे दिसत आहे. तसेच सिनेमात आमचे लाडके नेते इंदिरा गांधी, संजय गांधी यांच्यासह काँग्रेसमधील वरिष्ठ नेत्यांच्या भूमिका आणि उल्लेख असल्याचे पाहायला मिळाले. या सिनेमातून आमच्या नेत्यांची प्रतिमा मलीन तसंच बदनामी केली नसल्याची खात्री आम्हाला करायची असून सेन्सॉरकडून हिरवा कंदील मिळण्याआधी आम्हाला सिनेमा पाहायचा आहे. तुम्ही आमची समस्या समजून घेऊ शकता आणि मदत कराल अशी अपेक्षा आहे’.

पुढे वाचा, संजय गांधींच्या कथित मुलीनेसुद्धा केली सिनेमावर बंदीची मागणी…

संजय गांधींच्या कथित मुलीने केली सिनेमावर बंदीची मागणी…

या सिनेमावर आक्षेप घेणारे संजय निरुपम एकटेच व्यक्ती नसून याआधी प्रिया सिंग पॉल यांनी सिनेमावर बंदी आणण्याची मागणी केली आहे. ‘या सिनेमात इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे या सिनेमावर बंदी आणावी’, अशी मागणी प्रिया सिंग पॉल यांनी केली आहे.

प्रिया सिंग पॉल यांनी विरोध केल्याने एक वेगळाच मुद्दा आता चर्चेला आला आहे. कारण प्रिया सिंग पॉल कोण आहेत याची माहिती घेत असताना त्यांनी आपण संजय गांधी यांची मुलगी असल्याचा दावा केला आहे. प्रिया सिंग पॉल यांनी नोटीस पाठवताना आपण संजय गांधी यांची मुलगी असल्याचा उल्लेख केला आहे.

28 जुलै रोजी प्रदर्शित होतोय सिनेमा…

या सिनेमात किर्ती कुल्हारी मुख्य भूमिकेत आहे. कथा एका कवयित्रीची आहे. जी प्रशासनाविरुद्ध उभी राहते. किर्तीसोबत नील नितीन मुकेश, अनुपम खेर, टोटा राय चौधरी, परवीन दबस, शिबा चड्डा आदींच्या यात मुख्य भूमिका आहेत. या सिनेमात सुप्रिया विनोद ही इंदिरा गांधींची व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहे. हा सिनेमा 1975 च्या आणीबाणीच्या पार्श्वभूमीवर तयार होत आहे. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात 21 महिन्यांसाठी आणीबाणी जाहीर केली होती. त्या काळातील ही एक घटना आहे. नील नितीन मुकेश या सिनेमात संजय गांधींच्या भूमिकेत दिसणार आहे. येत्या 28 जुलै रोजी हा सिनेमा रिलीज होतोय.

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


  
















































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *