सांगली दि.3 (प्रतिनिधी)
मुस्लीम खाटीक समाजाच्या प्रश्नी येत्या अधिवेशनात ‘लक्षवेधी’ मांडण्याची ग्वाही माजी उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे, माजी गृहमंत्री आमदार जयंतराव पाटील यांनी दिली.
माधवनगरातल्या डेक्कन हाँल येथे राष्ट्रवादी काँग्रेंस पक्षाच्या मेळाव्याप्रसंगी खाटीक समाजाचे शिष्टमंडळ समाजाचे राज्याचे अध्यक्ष सादिक खाटीक (आटपाडी) यांच्या नेतृत्वाखाली या मान्यवरांना भेटले. या शिष्टमंडळात विलींग्डन महाविद्यालयातील प्रा.अखलाक ताडे, इचलकरंजी महाविद्यालयातील माजी प्राचार्य मुहम्मद हनिफ सय्यद, इंजिनीयर असिफ कलाल(आटपाडी), हाजी आयुब साहेबलाल पटेल, म.गौस मुसा खाटीक (मिरज), वाहीद बेद्रे, झाकीर बिजापूरे, आबीद दर्गावाले, बुशरान बिजापूरे, म्हारुप बिजापूरे, सलमान बक्करकसाई, जुबेर बिजापूरे (तासगाव), लतीफ खाटीक, जुबेर खाटीक(इस्लामपूर), इंजिनीयर आतीक ताडे (सांगली) यांचा समावेश होता.
हिंदू खाटीक बांधवाप्रमाणे मुस्लीम खाटीक बांधवांना अनुसूचित जातीची S.C (एस.सी) सवलत मिळावी या मुख्य मागणीसह अन्य १३ अन्य मागण्यांचे निवेदन ही आमदार सुमनताई पाटील यांच्यासह वरील मान्यवरांना देण्यात आले.
S.C (एस.सी) च्या आरक्षणाचा प्रश्न केंद्र पातळीवरील जरी असला तरी राज्याच्या अधिवेशनात यावर लक्षवेधीच्या माध्यमातून आवाज उठवू, असे अभिवचन अजितदादा पवार यांनी दिले.
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा











