👁 8 Views

ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार

-जनतेतून थेट सरपंच निवडीमुळे अनेकांच्या आनंदावर विरजण
नागपूर, ६ जून
येत्या ऑक्टोबर महिन्यात जिल्ह्यातील २३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. सरपंच पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची आणि रंगतदार होणार आहे.
गेल्या वर्षी जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा पहिला टप्पा पूर्ण झाला. उर्वरित २३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुका येत्या ऑक्टोबरमध्ये घेण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने दिलेले आहेत. प्रभाग रचना आणि जागांचे आरक्षण निश्‍चित करण्याबाबत निवडणूक आयोगाने कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्यानुसार प्रभाग प्रारूप रचना प्रक्रिया पूर्ण झाली आहे. प्रभाग रचना व आरक्षण ३ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात आले आहे. सरपंच पहिल्यांदाच थेट जनतेतून निवडण्याचा निर्णय ग्रामविकास विभागाने जाहीर केल्याने ग्रामपंचायतींची निवडणूक चुरशीची होणार आहे.
प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रभाग रचनेवर ४ जुलै ते ११ जुलैअखेर कार्यालयीन वेळेत हरकती दाखल करण्याकरिता तहसील कार्यालयात स्वतंत्र कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायतींची प्रभाग रचना व आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. या प्रभाग रचनेवर हरकती मागविण्यात आल्या आहेत. प्राप्त हरकतींची सुनावणी १५ जुलै रोजी होणार आहे. ३ ऑगस्ट रोजी अंतिम प्रभाग रचना जाहीर होणार आहे. ग्रामपंचायत निवडणूक विभागामार्फत निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पारण्यासाठी नेटके नियोजन केले आहे. प्रभाग रचनेत येणार्‍या हरकतींचा निपटारा करून अंतिम प्रभाग यादी जाहीर होईल. प्रभाग रचनेच्या अनुषंगाने कोणाच्या काही शंका राहणार नाहीत याची खबरदारी ग्रामपंचायत निवडणूक विभागातर्फे करण्यात आली आहे.
गूगल मॅपवरून नकाशे तयार करण्याची जबाबदारी तहसिलदारांवर सोपविण्यात आली आहे. संबंधित तलाठी आणि ग्रामसेवक यांनी स्थळ पाहणी करून प्रभाग पाडणे, सीमा निश्‍चित करणे, अनुसूचित जाती, जमाती यांचे आरक्षण निश्‍चित करण्यात आले आहे. प्रत्येक हरकती, सूचनांवर सुनावणीनंतर अभिप्रायासह अंतिम निर्णयासाठी प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयाकडे २५ जुलैपर्यंत पाठविणे बंधनकारक आहे. ३१ जुलैपर्यंत जिल्हाधिकारी या प्रस्तावाला अंतिम मंजुरी देतील. ३ ऑगस्टला प्रभाग रचना प्रसिद्ध केली जाईल.



  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *