👁 9 Views

मंगळसूत्राबद्दल पसरत चाललेल्या या अफवांवर विश्वास ठेवू नका!

महिलांमध्ये भीतीचं वातावरण


राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास कल्याण विभागाने याबाबतचे पत्रक जारी केले

सौभाग्याचं लेणं समजल्या जाणाऱ्या मंगळसूत्राबद्दल एक अफवा वाऱ्यासारखी पसरत आहे आणि अशा अफवांवर विश्वास ठेवून काही महिलांनी आपलं मंगळसूत्र तोडून टाकायला सुरूवात केलीये. अफवांचं पीक कुठून उठलं याची कोणीही शहानिशा केली नाही. मात्र मंगळसूत्रामध्ये असलेल्या लाल मण्यांमुळे पतीचे निधन होतं, अशा अफवांना पेव फुटल्याने कर्नाटक आणि आंध्रप्रदेश सीमेलगतच्या गावांतील महिलांनी आपलं मंगळसूत्र तोडून टाकलंय.
मंगळवारपासून सुरू झालेल्या या अफवा काही काळातच सीमेवरच्या सात जिल्ह्यांत वाऱ्यासारख्या पसरल्या आणि इथल्या महिलांनी घाबरून आपलं मंगळसूत्र तोडून टाकलं. एका महिलेनं लाल मणी असलेले मंगळसूत्र घातलं म्हणून तिचा नवरा वारला तेव्हा तुमच्या पतीला दीर्घ आयुष्य लाभावं, अशी जर तुमची इच्छा असेल तर मंगळसूत्र फेकून द्या किंवा हे मणी तोडून टाका, अशा प्रकारच्या अफवा कोप्पल, चित्रदुर्ग, बल्लारी, देवनागरी, रायचूर जिल्ह्यात पसरली.  शेवटी ही अफवा आणखी पसरून महिलांना घाबरून जाऊ नये यासाठी राज्य सरकारच्या महिला आणि बाल विकास कल्याण विभागाने याबाबतचे पत्रक जारी केले. या अफवांवर विश्वास ठेवू नका असे आवाहन पत्रकामार्फत करण्यात आलं.

  



















सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 

पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *