सोलापूर – ग्रामीण पोलिस हेल्मेट सक्तीची अंमलबजावणी करणार आहेत. पहिल्या टप्प्यात येत्या शनिवारपासून मुख्य महामार्ग राज्य महामार्गावर मोहिमेची सुरुवात होणार असल्याची माहिती पोलिस अधीक्षक वीरेश प्रभू यांनी दिली.
कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी सांगली, कोल्हापूर, सोलापूर, पुणे, सातारा या जिल्ह्यात हेल्मेट सक्तीच्या अंमलाचे अादेश दिले अाहेत. त्यानुसार ग्रामीण पोलिस मोहीम सुरू करत आहेत. विजापूर, हैदराबाद पुणे हे तीन राष्ट्रीय महामार्ग सोलापुरातून जातात. देगाव, तुळजापूर, अक्कलकोट, होटगी रस्ता हे राज्यमार्ग अाहेत. ग्रामीण पोलिस दलातील सर्व पोलिसांना मुख्य रस्त्यावर थांबून हेल्मेट सक्ती कारवाईबाबत सूचना देण्यात अाल्या अाहेत. याशिवाय वाहनांची कागदपत्रे, नियमानुसार नंबर प्लेट, वाहन परवाना या बाबींचे नियम पाळणे अावश्यक अाहे. सुरुवातीला राष्ट्रीय महामार्गावर मोहीम अधिक तीव्र राहणार असल्याचे श्री. प्रभू यांनी स्पष्ट केले.
कायद्याने दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्तीचे केले आहे. मात्र, वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांकडून त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नाही.
अशी होईल कारवाई
विजापूर रोडवर वडकबाळ पूल, पुणे रोडवर सोलापूर विद्यापीठ तर हैदराबाद रोडवर मुळेगाव क्राॅस रस्त्यापर्यंत शहराची हद्द अाहे. त्यानंतर पुढे जिल्ह्याची हद्द सुरू होते. त्यापुढे म्हणजे ग्रामीण हद्दीत गेल्यानंतर दुचारीस्वाराकडे हेल्मेट नसल्यास ग्रामीण पोलिस खात्यांतर्गत कारवाई होईल. राज्य मार्गावरही महापालिका नाक्याबाहेर म्हणजे ग्रामीण हद्दीत अाल्यावर कारवाई होऊ शकते.
शहरात अजूनतळ्यात-मळ्यात
शहरातही जुलैपासून हेल्मेट सक्ती करण्यात येईल, असे सहायक पोलिस अायुक्त वैशाली शिंदे यांनी सांगितले होते. याबाबत संभ्रमावस्था असल्यामुळे तूर्त ही मोहीम लांबणीवर पडली अाहे. सध्या फूटपाथवरील अतिक्रमण, दुचाकीची कागदपत्रे तपासणी मोहीम सुरू असल्याची माहिती शिंदे यांनी दिली. काॅलेजात जाऊन हेल्मेट सक्तीबाबत जनजागृती करणार अाहे. सोलापुरातही हेल्मेट सक्ती मोहीम करणार अाहोत. पण, अजून वरिष्ठांशी विचारविनीमय नियोजन सुरू अाहे. सध्या वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी नियोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
अल्पदरात!!
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा









