👁 10 Views

सर्वपक्षीयांचा हेल्मेटसक्तीला विरोध, नांगरे पाटलांसोबत बैठक

कोल्हापूर: विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी कोल्हापूर परिक्षेत्रात केलेल्या हेल्मेट सक्तीला सर्वपक्षीयांनी तीव्र विरोध केला आहे. हेल्मेट सक्तीबाबत तोडगा काढण्यासाठी कोल्हापूर पोलीस अधीक्षक कार्यालयात आज सर्वपक्षीय बैठक होत आहे.
या बैठकीला शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर, महापौर हसीना फरास यांच्यासह सर्व राजकीय पक्षांचे कार्यकर्ते उपस्थित आहेत.
कोल्हापूर परिक्षेत्रात हेल्मेटसक्ती
कोल्हापूरसह सांगली, सातारा, सोलापूर ग्रामीण आणि पुणे ग्रामीण या जिल्ह्यामध्ये 15 जुलैपासून वाहनचाकाना हेल्मेट सक्ती केली जाणार  आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी हा निर्णय घेतला आहे.
याची पूर्वतयारी म्हणून पोलीस प्रशासनाने वाहनचालकांमध्ये जनजागृती करण्यास सुरुवात केली आहे. पोलीस प्रशासनाने याची संपूर्ण तयारी केली असली, तरी शहराअंतर्गत हेल्मेट सक्तीला शिवसेनेनं विरोध दर्शवला आहे.
सध्या महामार्गावर विना हेल्मेट दुचाकीस्वार सापडला तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई करण्यास पोलिसांनी सुरुवात केली आहे. याचा दुसरा टप्पा म्हणून 15 जुलै पासून जिल्ह्यासह शहरातही हेल्मेट सक्ती करण्यात येणार आहे.
विश्वास नांगरे पाटलांच्या निर्णयाला शिवसेनेचा विरोध
शहराअंतर्गत हेल्मेटसक्ती होत असल्याने शिवसेना चांगलीच आक्रमक झाली आहे. शहरात वाढणाऱ्या चोऱ्या, हत्या, मारामाऱ्या यासह मटका, दारु या अवैध व्यवसायाकडे पोलीस जाणीवपूर्वक दुर्लक्ष करुन हेल्मेट सक्तीच्या मागे लागल्याचं म्हणत विरोध दर्शविला आहे. पोलिसांनी पार्किंग, वाहतूक कोंडी यावर उपाययोजना कराव्यात अशी मागणीही शिवसेनेने केली आहे.
  











































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *