👁 6 Views

त्या महिलेने दाखवला प्रामाणिकपणा…..

गोंदिया जिल्ह्याच्या सालेकसा तालुक्यातील महाराष्ट्र बँकेत काल ललिता डोंगरे या महिलेने ३७ हजार रुपये आपल्या बचत खात्यातून विड्रॉल केले. बँकेतील कॅशीयरने चुकीने ललिता डोंगरे याना ३७ हजार रुपया ऐवजी २ लाख ३५ हजार रुपये अशी रक्कम दिली. यात १०० रुपयाचे तीन बंडल आणि ५० रुपयांचा १ बंडल आणि दोन हजार रुपयांचा नोट देण्याऐवजी २ लक्ष रुपयाचा एक बंडल असे एकूण २ लाख ३५ हजार रुपये महिलेला दिले.
झाले असे कि सकाळी ललिता या बँकेत पैसे काढण्याकरीता गेले असताना बँकेतील इंटरनेट बंद असल्याने सकाळच्या वेळेत पैसे निघू शकले नाही. मात्र ललिता यांना पैश्याची गरज असल्याने त्यांनी लींक येई पर्यतं बँकेत वाट बघितली. दुपारी ३.३० वाजे दरम्यान इंटरनेट ची लिंक आली आणि बँकेत पैसे काढणाऱ्या लोकांची चांगलीच गर्दी झाली. तर याच गर्दीत बँकेतील कॅशीयरने ललिता याना ३७ हजार रुपया ऐवजी २ लाख ३५ हजार रुपये दिले. बँकेतील गर्दी पाहता आणि परतीची ट्रेन सुटेल या भीती पायी पैसे न मोजता ललिता तिथून निघून गेल्या. मात्र रात्री ९ वाजे घरी पोहचल्यावर ललिता यांनी पती संदीप डोंगरे यांना पैसे देण्याकरिता पिशवी उघडली असता २ लक्ष ३५ हजार रुपये असल्याचे लक्षात आले. त्यामुळे असे पाहून त्यांना घाम सुटला, पण रात्रीची वेळ असल्याने आणि बँक बंद झाली असल्याने त्याचा संपर्क बँकेशी होऊ शकला नाही. त्यामुळे ललिता यांनी सकाळी बँकेत जाऊन दोन लक्ष परत करत अजुनही माणुसकी जिवंत आहे हे दाखवून दिले.
तिकडे बँक मॅनेजर शिरीष देशपांडे यांनी बँक बंद करण्यापूर्वी जमा असलेल्या रकमेचा हिसोब केला असता २ लक्ष रुपये कमी भरत असल्याने त्यांची चांगलीच तारांबळ उडाली. बँकेत सर्वत्र रात्री ९ वाजे पर्यतं याचा शोध घ्यायला सुरवात केली मात्र पैसे कुठे सापडले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी ६ वाजे पासून बँकेत लावण्यात आलेले सीसीटीव्ही चित्रीकरण पाहून मोठी रक्कम विड्रॉल केलेल्या लोकांचे चल चित्र पाहण्यात आले. मात्र तरी देखील कुणाला जास्तीचे पैसे गेले काय याचा शोध लागला नाही. पुन्हा नव्याने चित्रीकरण तपासले असता ललिता डोंगरे या महिलेनं ३७ हजारांचा विड्रॉल केला असता २ लक्ष ३५ हजार रुपये चुकून त्यांना देण्यात आले असे निदर्शनाश आले. त्यांच्या पास बुक वरून आणि खाता क्रमांकावरून त्यांचा पत्ता शोधण्यात आला. सदर महिला ही सालेकसा तालुक्यात राहत नसून गोंदियात राहत असल्याची त्यांना माहिती मिळाली. बँक मॅनेजर शिरीष देशपांडे यांनी सदर महिलेच्या घरी येऊन भेट दिली असता ललिता या बँके कडे पैसे जमा करण्याकरीता निघाले असल्याचे समजले. त्वरित त्यांच्या मोबाईलवर फोन करून मॅनेजर ने महिलाच्या कुटंबीयांची भेट घेतली. दोन लक्ष रुपये कॅशियरच्या चुकीने निघालेलं परत केले असून  महिलेचा प्रामाणिक पणा पाहता अधिकाऱ्यांनी चैनेचा श्वास घेतला.
  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *