👁 10 Views

युटोपियन शुगर्सचे चालू गळीत हंगामाकरिता ६ लाख मे.टन गाळपाचे उद्दिष्ट :- उमेशराव परिचारक

मंगळवेढा प्रतिनिधी :-

             कचरेवाडी ता.मंगळवेढा  येथील युटोपियन शुगर्स कारखान्याने गळीत हंगाम २०१७-२०१८ ची तयारी पूर्ण केली आहे. पूर्वतयारीचा एक भाग म्हणून आज मिल रोलरचे पूजन होत आहे. चालू गळीत हंगामामध्ये ऊस उत्पादक व कर्मचारी वर्ग यांच्या विश्वासावरच ६ लाख मे.टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट युटोपियन पूर्ण करेल असा विश्वास युटोपियन शुगर्स चे संस्थापक – चेअरमन मा .उमेशराव परिचारक यांनी व्यक्त केला. 
              सदर प्रसंगी कारखान्याचे चार्टर्ड अकौंटंट मा. आर .व्ही .बजाज ,दि .पंढरपूर अर्बन बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. उमेश विरधे,कर्मयोगी पतसंस्थेचे संचालक मा. सी .एन. देशपांडे ,बाळासाहेब थोपटे ,मिलिंद बडवे यांचे समवेत कारखान्याचे सर्व खाते प्रमुख ,अधिकारी व कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित  होता . 
              पुढे बोलताना श्री .परिचारक म्हणाले की,युटोपियन शुगर्स ने मागील सर्वच गळीत हंगामामध्ये समाधानकारक कामगिरी केली आहे. एफ.आर.पी रकमेपेक्षा जास्त रक्कम युटोपियन ने आपल्या ऊस उत्पादकांना दिलेली आहे . गळीत हंगाम २०१६-२०१७ मध्ये दुष्काळी परिस्थिती  असताना सुद्धा चांगले गळीत  केले आहे . चालू वर्षी ऊस उत्पादकांकडे ऊसाची  उपलब्धता चांगली असून पांडुरंग परिवाराचे कुटुंब प्रमुख आदरणीय माजी आमदार श्री सुधाकरपंत परिचारक साहेबांच्या नावलौकिकामुळे व युटोपियन शुगर्स हा पांडुरंग परिवाराचाच असल्याने युटोपियन कडे ऊस उत्पादकांनी मोठ्या प्रमाणात नोंदी दिलेल्या आहेत . कारखाना नवीन असल्यामुळे व मागील वर्षीच्या  दुष्काळी परिस्थिती मुळे कामगार वर्गाच्या पगारीमध्ये वाढ करण्याचे राहिले होते.पगार वाढीबाबत सकारात्मक निर्णय लवकरच आम्ही घेणार आहोत. तसेच कर्मचारी व अधिकारी वर्गानेही आपले संपूर्ण कौशल्य पणाला लावून चालू गळीत हंगाम हा यशस्वीपणे चालवावा असे आवाहन श्री .परिचारक  यांनी केले.   

उपस्थित  मान्यवरांचे स्वागत व प्रास्ताविक करताना कार्यकारी संचालक मा. उत्तमराव पाटील म्हणाले कि,चालू वर्षी युटोपियन ने गाळप हंगाम यशस्वी करण्याच्या दृष्टीने संपूर्ण तयारी केली असून सर्व खाते प्रमुख ,अधिकारी व कर्मचारी यांच्या सहकार्याने चेअरमन  साहेबांनी दिलेली जबाबदारी पूर्ण करण्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्नशील राहणार आहे .कारखान्याचा यांत्रिक विभाग हि यासाठी सज्ज होत आहे . कारखान्याकडे आतापर्यंत ७ लाख मे . टन उसाच्या नोंदी झालेल्या आहेत . २५० वाहनांचे करार झालेले असून ५० डंपींग बैलगाडयांचे हि नियोजन केलेले आहे . ऊस उत्पादकांची ऊस उत्पादकता वाढावी या करीता खते,ठिबक,सुधारित ऊस बेणे आदींचे वाटप हि केले आहे. सरासरी ११टक्के रिकव्हरी मिळवण्याच्या उद्धेशाने कारखान्याच्या तोडणी प्रोग्रॅमचे नियोजन करण्यांत येणार आहे . भविष्यात एकरी १०० मे. टन ऊस उत्पादकता मिळवणेकामी विविध प्रकारच्या ऊस विकासाच्या योजना राबवणार असल्याचे प्रतिपादन श्री पाटील यांनी केले.
          यावेळी बोलताना अर्बन बँकेचे मुख कार्यकारी अधिकारी, मा. उमेश विरधे म्हणाले की युटोपियनने सुरुवातीपासूनच काटकसरीने व सर्व आर्थिक निकष पूर्ण करीत चांगली कामगिरी केली आहे. म्हणून आज युटोपियन कडे ऊस उत्पादकांचा वाढता कल दिसतो आहे. युटोपियन ने ही आदर्श कामाची परंपरा अशीच चालू ठेवावी 
    कार्यक्रमाचे आभार चिफ  इंजिनीअर  सुनिल महामुनी यांनी मांडले तर सूत्रसंचालन सेल अकाउंटंट लक्ष्मण पांढरे यांनी केले. 
फोटो ओळी :- गळीत हंगाम २०१७-१८ करीता मिल रोलर पूजन प्रसंगी कारखान्याचे संस्थापक – चेअरमन श्री. उमेशराव परिचारक , कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील, कारखान्याचे चार्टर्ड अकाउंटंट मा. आर.व्ही. बजाज, दि पंढरपूर अर्बन बँकेचे कार्यकारी अधिकारी मा. उमेश विरधे, कर्मयोगी पतसंस्थेचे संचालक मा. सी.एन. देशपांडे, बाळासाहेब थोपटे, मिलिंद बडवे यांचे समवेत कारखान्याचे सर्व खातेप्रमुख अधिकारी व कर्मचारी वर्ग दिसत . 
  
















































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *