👁 10 Views

प्रक्षाळपूजेनिमित्त पश्चिमव्दारच्या व्यापा-यांकडून अन्नदान

 पंढरपूर / प्रतिनिधी 


येथील पश्चिमव्दार व्यापारी संघटनेच्या वतीने प्रक्षाळपूजेनिमित्त हजारो भाविकांना अन्नदान करण्यात आले आहे. यावेळी या अन्नदानांची सुरूवात सुधाकरपंत परिचारक यांच्या शुभहस्ते विठठलांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
   पश्चिमव्दार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष बाबाराव महाजन यांच्या संकल्पनेतून  गेल्या चार वर्षापासून प्रक्षाळपूजेदिवशी व्यापा-यांकडून अन्नदान केले जात असते.  याच अन्नदानांचा शुभारंभ दुपारी बारा वाजता परिचारक यांच्या शुभहस्ते प्रतिमा  पूजन करून झाला. यावेळी  नगराध्यक्षा साधना भोसले , वा.ना.उत्पात , मदन महाराज हरिदास , ह.भ.प. रामकृष्ण महाराज वीर , उपनगराध्यक्षा सुजाता बडवे , ह.भ.प. शंकर महाराज बडवे , प्रभाकर कौलवार , आदि यावेळी  उपस्थित होते. 
       या कार्यक्रमांच्या निमित्ताने सर्व व्यापा-यांनी एकत्र येउन सुमारे ३ हजार भाविकांना यावेळी  विठठलांचा महाप्रसादांचे वाटप केले. अत्यंत शिस्तबध्द रित्या तसेच पश्चिमव्दार सारख्या महत्वांच्या मार्गावर स्वच्छतेचे भान राखत सदरचे अन्न्दान व्यापाऱ्यांकडून  करण्यात आले आहे.
    प्रक्षाळपूजेदिवशी विठठलांचा यात्रा कालावधी मधील शिणवटा घालवला जात असतो. याचवेळी  पश्चिमव्दारचे व्यापारी यांनी एकत्र ज्या भाविकांच्या जीवावर व्यापार होतो. त्यांच आषाढीतील व्यापारांतून मिळालेल्या फायदांची काही रक्कम ही भाविकांना राखून ठेवत. याच रक्कमेतून सदरचे अन्नदान हे करीत आहेत. त्यामुळे  निश्चितच येथील व्यापा-यांचे हे कार्य कौतुकास्पद असल्यांचे वेळोवेळी  सिध्द झाले आहे.
    सदरचे अन्नदान करण्यासाठी पश्चिमव्दार व्यापारी संघटनेचे यशवंत पवार , प्रसाद डोंगरे , राजू कौलवार , अवधूत महाजन , गणेश महाजन , प्रशांत पाटील , सुधाकर अलंकार , सतिश श्रीखंडे , सलमान काझी , अशोक खंडागळे  , दत्ता कौलवार , श्रीपाद भाडुळे  , किशोर दोमकुंडवार , कौस्तुभ बडवे , स्वप्निल गाडे , शैलेश घोडके , भागवत बडवे आदि व्यापा-यांनी यावेळी  परिश्रम घेतलेले आहेत.

  














































सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! 
पंढरपूर लाईव्ह वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या.. 
अल्पदरात!! 
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला फाॅलो करा


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *