पंढरपूर Live :- वैद्यकीय महाविद्यालयात शिकणाऱ्या सहकारी डॉक्टरच्या एकतर्फी प्रेमाला आणि सासरच्या छळाला कंटाळून पंढरीतील एका 24 वर्षीय विवाहीतेने विष पिऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
याबाबत शहर पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार
पुजा बापुराव पाखरे ( वय -२४ रा . हरीनयन पार्क पंढरपूर ) या विवाहितेने रविवारी दुपारी विष पिवुन आत्महत्या केलीय . विरेशकुमार जालानी असे तिला त्रास देणाऱ्या सहकारी डॉक्टरचे नाव आहे .
पुजा पाखरे ही सोलापुरच्या गांधीनाथा होमिओपॅथी वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत होती . २०१२ साली पुजाचा विवाह बापु पाखरे यांचासोबत झाला होता . विवाहानंतर देखिल पुजा आपले वैद्यकीय शिक्षण घेत होती . दरम्यानच्या काळात तिच्याच महाविद्यालयात शिकणाऱ्या विरेशकुमार जालानीने पुजाला मानसिक त्रास देण्यास सुरवात केली . तो पुजा वारंवार फोन करुन धमकी देत असे . विरेशकुमारचे पुजावर एकतर्फी प्रेम होते . पुजा विरेशकुमारच्या त्रासाला वैतागून गेली होती .
पुजाने हि गोष्ट माहेर आणि सासरच्या मंडळीनां सांगितली . रविवारी पुजा आपल्या पती , आई , वडील यांच्यासह सोलापूरला विरेशकुमारला समजावुन सांगण्यासाठी गेले होते. मात्र छळ असाह्य झाल्याने पुजाने घरी आल्यानंतर काहि वेळातचं विष पिवुन आपली जिवन यात्रा संपवली. पुजाचा पती देखिल पुजाच्या चारित्र्यावर घेत होता. असा आरोप पुजाच्या वडिलानीं केला आहे . पुजाने लिहलेली चिठ्ठी आणि वडिलांच्या फिर्यादीवरुन पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे . पुजाचा पती बापु पाखरे आणि डॉक्टर विरेशकुमारला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे .










