पंढरपूर, दि.18: राज्याच्या महिला व बालविकास राज्यमंत्री श्रीमती विद्या ठाकूर यांनी श्री.विठ्ठल-रुक्मिणी मातेचे सहकुटूंब दर्शन घेतले. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदीर समितीच्या वतीने मंदीर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व श्रींचा फोटो देवून सत्कार करण्यात आला. यावेळी तहसिलदार मधुनसूधन बर्गे, बालविकास प्रकल्प अधिकारी किरण जाधव, मंदीर समितीचे व्यवस्थापक विलास महाजन यांच्यासह मंदीर समितीचे कर्मचारी उपस्थित होते.
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











