पुणे जिल्ह्यातील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पावसामुळे उजनीत बंडगार्डन व दौंड येथून पाण्याचा विसर्ग येण्यास सुरुवात झाल्याने उजनी धरणात गेल्या चार दिवसात जवळपास ११ टक्के पाणीसाठा वाढला आहे़ सध्या उजनी धरणात दौंड येथून १३,५८६ क्युसेक्सचा विसर्ग मिसळत आहे़ त्यात कमी झालेल्या बंडगार्डनच्या विसर्गात सकाळपासून वाढ झाली असून, सायंकाळपर्यंत उजनी धरण प्लसमध्ये येणार आहे.
गेल्या चार दिवसांपासून वरील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पावसामुळे उजनीत जवळपास ७ टीएमसी पाणी वाढले आहे़ या पावसामुळे गेल्या तीन महिन्यांपासून उजनीला पडलेला मायनसचा विळखा आज सायंकाळपर्यंत निखळला़
उजनी धरण प्लसमध्ये येणे म्हणजे एकप्रकारचे धरण भरण्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे़ सध्या उजनी धरणातून थोड्याफार प्रमाणात पाणी भीमा नदीत सोडण्यात येत आहे़ त्यात पाऊस नियमितपणे पडू लागल्याने त्या धरणाच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे़ म्हणून १९ पैकी १९ धरणांतून पाण्याचा विसर्ग चार-पाच दिवसात मोठ्या प्रमाणात चालू होण्याची दाट शक्यता आहे़ सोलापूर जिल्ह्यात पावसाने आणखी ओढ दिल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण झाले असले तरी उजनीत दौंडमधून विसर्ग येऊ लागला आहे़ त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे़ उजनी गेल्या वर्षापेक्षा जवळपास एक महिना अगोदर प्लसमध्ये येत आहे़ कारण गेल्या वर्षी उजनी धरणात पाणी लवकर येण्यास सुरुवात झाली आहे़
– आज उजनी धरणाची पाणीपताळी ४९०़६४० मी़
– एकूण पाणीसाठा: १७२७़१९ दलघमी
– उपयुक्त पाणीसाठा: ७५़६२ दलघमी
-टक्केवारी:- ४़९८ टक्के (मायनस)
– विसर्ग: दौंड १३५८६ क्युसेक्स
– बंडगार्डन १९७२० क्युसेक्स
जाहिरात
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











