👁 8 Views

तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके

तलवारबाजीचा सीन शूट करताना कंगना जखमी, डोक्याला 15 टाके
20 Jul. 2017

हैदराबाद : अभिनेत्री कंगना रणावत ‘मणिकर्णिका : द क्वीन ऑफ झासी’ या तिच्या आगामी सिनेमाची शूटिंग करताना जखमी झाली आहे. तलवारबाजीचा सीन शूट केला जात होता, त्याचवेळी तलवार कंगनाच्या डोक्याला लागली आणि ती जखमी झाली.
हैदराबादमध्ये या सिनेमाची शूटिंग सुरु आहे. या घटनेनंतर कंगनाला तातडीने अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. तिच्या डोक्याला 15 टाके पडले असून आणखी काही दिवस तिला रुग्णालयातच ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे.

सीनची तयारी अनेकदा केली होती. मात्र शूटिंग करताना थोडा गोंधळ झाला. निहार पंड्या कंगनावर तलवारीने वार करतो तेव्हा कंगनाला डोकं खाली झुकवायचं असतं. मात्र वेळ चुकली आणि कंगनाच्या दोन्ही भुवयांच्या मध्ये तलवार लागली. तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, अशी माहिती सिनेमाचे निर्माते कमल जैन यांनी दिली.

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  



































Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *