👁 9 Views

स्वेरीच्या शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेत वाढ ! -स्वीडनचे प्रा. मार्टिन स्कालबर्ग

स्वीडनच्या मार्टिन स्केलबर्ग यांची श्री विठ्ठल अभियांत्रिकीला सदिच्छा भेट

कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड  इंजिनिअरिंग मधील विध्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वीडनचे प्राध्यापक मार्टिन स्कालबर्ग.

पंढरपूर- ‘१९९८ साली गोपाळपूर (ता.पंढरपूर)च्या ओसाड माळरानावर स्थापन झालेल्या झालेल्या श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूटच्या शैक्षणिक कार्याची खरी प्रचिती महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आली असून शिक्षणाबरोबरच संशोधनाच्या निमित्ताने भारतातील संशोधक, प्राध्यापक स्वेरीत येत आहेत. आता स्वेरीने यापुढे आणखी एक पाऊल टाकले असून शैक्षणिक विकासामुळे व प्रगतीमुळे स्वेरी अभियांत्रिकीचे नाव आता सातासमुद्रापार गेले असून भविष्यात येथील शिक्षण पद्धतीचे परदेशात देखील अनुकरण केले जाईल.’ असा विश्वास स्वीडनचे प्राध्यापक मार्टिन स्कालबर्ग यांनी व्यक्त केला. 
            स्वीडन मधील स्टॉकहोम मधील हॉगस्कोलन महाविद्यालयात स्विडीश भाषेचे प्राध्यापक असणारे मार्टिन स्कालबर्ग यांनी नुकतीच श्री विठ्ठल अभियांत्रिकीला भेट दिली यावेळी त्यांनी शिक्षण क्षेत्रातील झालेला बदल व यातून विद्यार्थ्यांची होत असलेल्या प्रगतीने ते भारावून गेले. प्रारंभी संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी मार्टिन स्कालबर्ग यांचे स्वागत केले. प्रा. स्कालबर्ग यांनी स्वेरीत येण्याचे प्रयोजन सांगून व स्वेरीची यशोगाथा ऐकण्याची इच्छा व्यक्त केली. यावर डॉ.रोंगे यांनी १९९८ पासून ते आजतागायत स्वेरीची वाटचाल, झालेले करार, शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे बौद्धिक क्षमता व विकासातील झालेले बदल, वाटचालीतील महत्वाचे टप्पे, वसतिगृह, भव्य वाचनालय, हुशार व होतकरू विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा आणि शिका’ योजना, संशोधनातील प्रगती व त्यासाठी आलेला निधी यावर प्रकाश टाकला. हे ऐकून व ग्रामीण भागात असूनही मुलांमध्ये झालेली प्रगती पाहून स्कालबर्ग भारावून गेले. यावर त्यांनी देखील भविष्यात स्वेरी समवेत सामंजस्य करार स्थापित करण्यासाठी सहमती दर्शविली.त्यांनी महाविद्यालयातील विविध विभागांची पाहणी करून सर्व सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी कॉम्प्युटर सायन्स अॅण्ड  इंजिनिअरिंग विभागातील विद्यार्थ्यासमवेत तब्बल दीड तास चर्चा करून स्वीडनमधील व येथील शिक्षण पद्धतीचा चर्चात्मक अभ्यास केला. स्वीडन मधील अभ्यासासाठी असणारे वातावरण व स्वेरीतील वातावरण यांच्या तुलनात्मक अभ्यास करून ‘स्वेरीचे पंढरपूर पॅटर्नचे अनुकरण केल्यास स्वीडन मधील विद्यार्थी देखील शिक्षण क्षेत्रात भरारी घेवू शकतील.’ असा विश्वास व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी परिसराची पाहणी करून काही भागातील विशेष नोंदी करून छायाचित्र देखील आपल्या कॅमेऱ्यात कैद केले. यावेळी अधिष्ठाता डॉ. प्रशांत पवार, ट्रेनिंग  अॅण्ड प्लेसमेंटचे अधिष्ठाता डॉ.माधव राऊळ, वसतिगृह व्यवस्थापक प्रा. एम.एम.पवार, प्रा. श्रीनिवास दर्शने,रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, वरिष्ठ लिपिक नागेश ताडे यांच्यासह इतर प्राध्यापक वर्ग उपस्थित होते.


जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  
























Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *