👁 8 Views

अभिनेत्याने राधिकाला हॉटेल रुममध्ये बोलावून घेतल्यानंतर काय घडले?

सेक्सकरिता त्याने मला भुलवण्याचा बराच प्रयत्न केला.

Advertisement

अभिनेत्री राधिका आपटे ही तिच्या बोल्ड दृश्यांसाठी चर्चेत असते. लवकरच राधिका आपटे ही चित्रपटसृष्टीत विद्या बालनची जागा घेईल असे म्हटले जातेय. या दोन्ही अभिनेत्रींचा अभिनय आणि त्यांचा देसी लूक हा त्यांना प्रसिद्धीत आणण्याचे मुख्य कारण आहे. विद्या बालनने ‘परिणीता’ चित्रपटात इंटिमेट सीन दिले होते. त्यानंतर तिने केलेला ‘डर्टी पिक्चर’ हा चित्रपट तर कोणी विसरूच शकत नाही. त्याचप्रमाणे राधिका आपटेही बोल्ड सीन देण्यात मागे हटत नाही. फक्त तशी कथेची मागणी असायला हवी. ‘पार्श्ड’मधील दृश्य ही कथेची मागणी असल्याचे राधिकाने म्हटले होते. पण आता आपण बोलत आहोत ते कास्टिंग काउचबाबत.

एका संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत राधिकाने कास्टिंग काउचबद्दल बरेच खुलासे केलेले. आपल्याला या बाबत खूप काही माहित असल्याचे राधिकाने सांगितले. राधिका म्हणाली की, असे बरेचजण मला माहित आहेत जे कास्टिंग काउचला बळी पडले आहेत. पण, आता त्या मुलींची नावं घेणं योग्य ठरणार नाही. कारण काही मुली काम मिळवण्याच्या लालसेने निर्माता-दिग्दर्शक-अभिनेता यांच्यासोबत शारीरिक संबंध ठेवण्यासाठी भाग पडतात.
याबाबतीत मी खूप नशीबवान आहे. मला कोणीच थेट येऊन असे काहीच विचारले नाही. मात्र, दाक्षिणात्य भागात एकदा मला अप्रत्यक्षपणे सेक्ससाठी चेतवण्यात आले, पण त्याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. झालं असं की, एका अभिनेत्याने मला हॉटेल रुममध्ये बोलावले होते. मी रुमवर पोहताच तेथील दृश्य पाहून त्या अभिनेत्याचा हेतू मला कळला. सेक्सकरिता त्याने मला भुलवण्याचा बराच प्रयत्न केला. मात्र, त्याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही. त्यावेळी तो माझ्यासोबत भांडण करेल असे मला वाटले होते. पण तसे काहीच झाले नाही. मी रुमच्या बाहेर आले आणि त्यानेही मला थांबवण्याचा प्रयत्न केला नाही.
मुलाखती दरम्यान, राधिकाने आणखी एका घटनेबाबत सांगितले. ती म्हणाली की, मला एकदा फोन आला होता की काही लोक बॉलीवूडमध्ये चित्रपट काढत आहेत. त्यांच्याशी तुमची भेट करून द्यायची आहे. पण ही लोक इतवर थांबली नाहीत. त्या व्यक्तिसोबत रात्र काढण्यास तुमची हरकत नाही ना, असेही त्याने विचारले. त्यावर मला हसू आले आणि तुम्ही फारच विनोदी आहात. मी नाही करू शकत, भाड में जाओ, असे मी त्याला म्हटले, असे राधिकाने सांगितले.

जाहिरात 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




  















Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *