👁 6 Views

७० ते ८० लाखाचे चंदनसाठ्यासह संशयीत आरोपींना पंढरपूर तालुक्यातील आढीव मधून अटक..

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

७० ते ८० लाखाचे चंदनसाठ्यासह संशयीत आरोपींना पंढरपूर तालुक्यातील आढीव मधून अटक..


 पंढरपूर Live 27 Julay 2017

कोल्हापूर मधील वनविभागाच्या रोपवाटिकेतील जवळपास  एक कोटी रूपये चंदन चोरी प्रकरणी पंढरपूर तालुक्यातील  आढीव परिसरात रात्री कोल्हापूर पोलिसांनी दोन ते तीन जणांना ताब्यात घेतल्याची प्राथमीक माहिती मिळतेय. 
सन २०११-१२ मध्ये अवैध वाहतूक तपासणीदरम्यान कोल्हापूर मध्ये पोलिसांनी ७० ते ८० लाखाची चंदनचोरी उघडकीस आणली होती. हे सर्व चोरीचे चंदन कोर्टाचे आदेशानुसार कोल्हापूर वनविभागाच्या रोपवाटीकेत बरेच वर्षापासून ठेवलेले होते. ते चंदन गेल्या मंगळवारी चोरीस गेले होते. याचा तपास पोलीस घेत असताना एलसीबी पथकाला पंढरपूर तालुक्यातील आढीव गावात हा चंदनसाठा असल्याचा सुगावा लागला. व एलसीबी पथकाने काल रात्री दीड वाजणेच्या दरम्यान येथे छापा टाकून चंदनसाठा व काही संशयीत आरोपींना ताब्यात घेतल्याची प्राथमीक माहिती समजते.

या चंदनचोरीतला मुख्य आरोपी मात्र अद्याप फरार असल्याचे समजते. मात्र पोलिसांकडून अद्याप तरी याबाबत कसलीही माहिती प्रसिद्धी माध्यमांना देण्यात आलेली नाही.

याबाबत अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न पंढरपूर Live करत असून लवकरच याबाबत सविस्तर अधिक्रुत बातमी पंढरपूर Live वर प्रसिद्ध करण्यात येईल.


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111









  























Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *