पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
पंढरपूर Live 28 Julay 2017
धक्कादायक..! पतीची हत्या करुन ‘ती’ मृतदेहासोबत 2 दिवस झोपली
नवी दिल्ली, दि. 28 – दारू पिऊन अतिशय घाणेरड्या शिव्या देणा-या व मारहाण करणा-या पतीला कंटाळलेल्या एका महिलेनं त्याची हत्या केल्याचे वृत्त समोर आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पतीच्या मृतदेहाचा बंदोबस्त करता न आल्याने दोन दिवस ही महिला चक्क पतीच्या मृतदेहाशेजारीच झोपली. ही घटना दिल्लीतील कापसहेडा परिसरातील आहे. दोन दिवसांनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी तिला युक्ती सुचली.
यानुसार तिस-या दिवशी सकाळी तिनं लोकांना असे सांगितले की, पतीचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू झाला आहे. लोकांनाही तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवला व मृतदेह घेऊन ते स्मशानभूमीत पोहोचले. आरोपी महिलेचं नाव शिल्पी अधिकारी (वय 32 वर्ष )असे असून पती नितीशची हत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी तिला अटक केली आहे.
कसा उघड झाला गुन्हा?
दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, एका व्यक्तीनं या घटनेची माहिती पोलिसांना दिली व मृतदेहावर अंत्यसंस्कार होण्यापूर्वी 15 मिनिटांपूर्वी पोलीस स्मशानभूमीत पोहोचले. पोलिसांनी संशय आल्यानं त्यांनी मृतदेह रुग्णालयात पोस्टमार्टेमसाठी नेला. पोस्टमार्टेम रिपोर्टमुळे घडल्या प्रकाराचे सत्य सर्वांसमोर आले. या रिपोर्टमध्ये मृत व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली. याप्रकरणी आरोपी पत्नी शिल्पीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पोलिसांनी केलेल्या चौकशीमध्ये शिल्पीनं सांगितले की, नितीश दारू पिऊन मारहाण करायचा, सोबत शिवीगाळदेखील करायचा. त्याच्या या छळामुळे शिल्पी कंटाळली होती. या सर्व त्रासातून तिला मुक्तता हवी होती. याच कारणामुळे तिनं नितीशची गळा दाबून हत्या केली. शिल्पी मूळची पश्चिम बंगालमधील रहिवासी होती. शिल्पी व नितीशची दोन मुलं आहे. दोघंही मुलं शिल्पीच्या आईवडिलांजवळ राहतात. तर नवी दिल्लीत शिल्पी व नितीश राहत होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111











