👁 7 Views

रस्त्याच्या खोदकामात सापडली सोन्या चांदीची नाणी..! लोकांकडून दागिन्यांची लूट!!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 29 July 2017


 रस्त्याच्या खोदकामात सापडली सोन्या चांदीची नाणी..! लोकांकडून दागिन्यांची लूट!!

करौली- राजस्थानातील करौली शहरात हिंडोन गेटजवळ रस्त्याचे काम चालू असताना सोन्या-चांदीची नाणी सापडली. पाहता पाहता लोकांची गर्दी जमली आणि लोकांनी दागिने व चांदीची नाणी गोळा करण्यास सुरुवात केली. दागिन्यांची लूट करण्यावरून मारामाऱ्या सुरू झाल्या. तेव्हा घटनास्थळी पोलिस दाखल झाले. त्यांनी गर्दीला पिटाळून लावले.

तोपर्यंत सुमारे १० ते १२ जणांनी चांदीची नाणी व सोन्याचे दागिने लुटून नेले. जेसीबी चालकाकडेही एक किलो चांदी सापडली, तर इतरांकडे चांदीचे दागिने व नाणी सापडली. नगर परिषदेचे सभापती आणि पाेलिस प्रशासनाने फावडे व जेसीबीच्या साह्याने आणखी रस्ता खोदला असता आणखी २२ चांदीची नाणी सापडली.

करौली येथील सहायक जिल्हाधिकारी राजनारायण शर्मा यांनी सांगितले, चांदीचे पाच कडे आणि १९४२ मधील चांदीची २२ नाणी तसेच सुमारे दीड किलो चांदी कोशागारात जमा करण्यात आली आहे. ज्या लोकांनी दागिने नेले त्यांचाही शोध घेण्यात येत आहे.

जे हाती लागेल ते नेले

शुक्रवार, दुपारी २ वाजेची वेळ.. नगर परिषदेने गुलाब बाग ते हिंडोन गेटपर्यंत गौरव पथ तयार करण्यासाठी काही दिवसांपासून नाल्याचे खोदकाम अतिक्रमणे काढणे इत्यादी काम सुरू केले. दुपारी दुकानांची तोडफोड व नाल्याचे खोदकाम सुरू असताना चांदीचे दागिने सापडले. त्यावर लोक तुटून पडले.




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  






Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *