👁 8 Views

स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयालासोलापूर विद्यापीठाचा ‘उत्कृष्ठ महाविद्यालय’ पुरस्कार जाहीर…! येत्या १ ऑगस्टला विद्यापिठात पुरस्कार वितरण

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! 

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 29 July 2017


स्वेरी अभियांत्रिकी महाविद्यालयालासोलापूर विद्यापीठाचा ‘उत्कृष्ठ महाविद्यालय’ पुरस्कार जाहीर

येत्या १ ऑगस्टला विद्यापिठात पुरस्कार वितरण
पंढरपूर– सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने यंदा ग्रामीण भागातील उत्कृष्ठ महाविद्यालय म्हणून  गोपाळपूर (ता. पंढरपूर ) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित इंजिनिअरींग कॉलेजची निवड करण्यात आली.  या पुरस्काराने विध्यार्थ्यांच्या गुणवत्तेचा व विकासाचा वारू आणखी प्रगतीकडे व नवनवीन योजनाकडे झेपावणार हे मात्र नक्की.  
            ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना उच्च तंत्र शिक्षणाची गरज ओळखून  डॉ.रोंगे यांच्यासह इतर १६ अभियंत्यांनी एकत्रित येवून  १९९८ साली स्वेरीची स्थापना केली त्यानंतर शिक्षणाची पद्धत पाहून नवनवीन उपाय योजना यासास्वी राबविल्यामुळे प्रचंड यश मिळाले. आणि विद्यार्थ्यांची अडचण दूर झाली. प्रचंड परिश्रम घेतल्यामुळे प्रत्येक वर्षी यशाचा आलेख उंचावत चालला. गेल्या ३ वर्षापासून विध्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाचे असणाऱ्या वार्षिक परीक्षेचा निकाल व कॅम्पस प्लेसमेंट यामध्ये आघाडी घेतली आता प्रवेशामध्ये देखील आघाडी घेतली आहे. पुरस्काराने स्वेरी परीवाराबबरोबरच स्वेरीत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही आनंद झाला आहे. या महाविद्यालयाच्या ‘पंढरपूर पॅटर्न’ची ख्याती संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली असून वार्षिक परीक्षेचा निकाल असो, अथवा कॅम्पस प्लेसमेंट असो यामध्ये आघाडी तर राखलीच आहे पण त्यातून अभियांत्रिकीला प्रवेश घेणार्या विद्यार्थ्यांचे पालक मात्र वेगळ्याच समाधानात असतात. त्याचे कारणही तसेच आहे. महाविध्यालायातून पाल्याकडे दिले जाणारे वैयक्तिक लक्ष, शिस्त व आदर, शिकविण्याची पद्धत व अभ्यास करून घ्यायची पद्धत त्यामुळे स्वेरीतील कोणत्याही विद्यार्थ्याला अतिरिक्त शिकवणी लावण्याची गरज पडत नाही. म्हणूनच स्वेरीत आपले पाली असावे असे आता सर्वांनाच वाटत आहे. म्हणूनच की काय या लक्षवेधी योगदानामुळे सोलापूर विद्यापीठ सोलापूरने देखील उत्कृष्ठ महाविद्यालय म्हणून स्वेरीचे नाव घोषित केले. येत्या १ ऑगस्ट रोजी सोलापूर विध्यापिठात होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ,जळगावचे कुलुगुरू प्रा. पी.पी. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संस्थेचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे पारितोषक स्वीकारणार आहेत.

‘आम्ही आमचे काम पार पाडत आहोत. अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमात संशोधनाद्वारे आधीक ज्ञान मिळून विद्यार्थ्याच्या गुणवत्तेच्या वाढीस मदत मिळते. विद्यार्थ्यांना उद्योजक बनण्यासाठी प्रेरित करणार, तसेच  यु.पी.एस.सी., एम.पी.एस,.सी. अशा स्पर्धा परीक्षेतून विशेष करून ग्रामीण भागातील विध्यार्थी उच्च दर्जाचे अधिकारी कसे होतील याकडे कल  राहील. या पुरस्काराने आमच्या टीमला अधिक उर्जा मिळाली असून विविध प्रयोग राबवून ते यासस्वी कसे होतील ? याकडे लक्ष केंद्रीत करणार आहोत.’ 
                                                                        –डॉ. बी.पी. रोंगे, प्राचार्य श्री.विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालय, पंढरपूर.
       


 स्वेरी ग्रामीण भाग असूनही मोठमोठ्या शहरातील विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला देखील आता स्पर्धेत उतरल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचा मोठ्या शहराकडे जाण्याचा जो कल होता याला आता आवर घातला जाणार आहे. या पुरस्काराने पंढरपूर सह संपूर्ण पंचक्रोशीत आनंद पसरला आहे. पुरस्कार घोषीत झाल्याचे पाहून सांगली वालचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ . ए.आर. यार्दी  यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी डॉ. एस.एच.कुलकर्णी ,अधिष्ठाता डॉ. एस.एम.मुकणे, रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, सचिन पाटील,  प्राध्यापक व पालक उपस्थित होते.
छायाचित्र– सोलापूर विद्यापीठ सोलापूरच्या वतीने यंदा उत्कृष्ठ महाविद्यालय म्हणून  गोपाळपूर (ता. पंढरपूर ) येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट संचलित इंजिनिअरींग कॉलेजची निवड करण्यात आली त्यामुळे सांगली वालचंद महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉ . ए.आर. यार्दी  यांच्या हस्ते स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकीचे प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी सोबत डावीकडून रजिस्ट्रार राजेंद्र झरकर, अधिष्ठाता डॉ. एस.एम.मुकणे, डॉ. एस.एच.कुलकर्णी  व पालक




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  



Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *