👁 6 Views

अक्षरा हसनने बौद्ध धर्म स्वीकारला? काही दिवसांपूर्वी अक्षराने ती नास्तिक असल्याचे सांगितले होते..

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 30 July 2017

अक्षरा हसन आणि कमल हसन

गेल्या काही दिवसांपासून साऊथचे सुपरस्टार कमल हसन यांची मुलगी अक्षरा हसन चर्चेत आली आहे. पण ती कोणत्या सिनेमासाठी नाही तर धर्मावरून चर्चेत आली आहे. काही दिवसांपूर्वी दिलेल्या मुलाखतीत अक्षराने ती नास्तिक असल्याचे सांगितले होते. पण तिला बौद्ध धर्माबद्दल फार उत्सुकता होती त्यामुळे ती बौद्ध धर्म स्वीकरण्याचा विचार करत असल्याचे म्हटले जात आहे. कमल हसन यांनी तिला ट्विट करत ‘तू धर्म बदललास का?’ असा प्रश्न विचारला. ‘जरी तू धर्म बदलला असलास तरी माझे तुझ्यावर तेवढेच प्रेम आहे. आयुष्याचा आनंद घे…’ बाबांच्या या ट्विटला उत्तर देत अक्षरा म्हणाली की, ‘नाही बाबा अजून मी नास्तिकच आहे. पण बौद्धत्वाशी मी सहमत आहे. जीवन जगण्याचा तो एक उत्तम मार्ग आहे.’

Hi. Akshu. Have you changed your religeon? Love you, even if you have. Love unlike religeon is unconditional. Enjoy life . Love- Your Bapu
Hi bapuji. No, still an atheist. Although i agree with budhism as it is a way of life and in an individuals way of life.

अक्षरा सध्या तिचा अजीत कुमार दिग्दर्शित आगामी सिनेमा ‘विवेगम’च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. या सिनेमातून ती तामिळ सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे. पण एका आघाडीच्या वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत तिने बौद्ध धर्म स्वीकारला असल्याचे म्हटले होते. तिला बौद्ध धर्माची तत्व फार पटली असल्याचे तिने मुलाखतीत म्हटले.
आपली मोठी बहिणी श्रुती हसन जशी नावाजलेली अभिनेत्री आहे तसेच आपण व्हावे अशी अक्षराची अजिबात इच्छा नाही. तिला वडिलांसारखे दिग्दर्शनात जायचे आहे. भविष्यात तिला कमल, सारिका आणि श्रुती हसन यांना एकत्र घेऊन सिनेमाचे दिग्दर्शन करायचे आहे.
अमिताभ बच्चन आणि धनुष यांच्यासोबत ‘शमिताभ’ सिनेमातून तिने आपल्या सिनेकरिअरला सुरूवात केली होती. यानंतर ती ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’ या सिनेमातही दिसली होती.




पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *