👁 7 Views

सदाभाऊंवर आरोप करणारी महिला ‘खोटारडी’ ?

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. ! सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 

पंढरपूर Live 31 July 2017

सदाभाऊंवर आरोप करणारी महिला ‘खोटारडी’ ?


सदाभाऊंवर आरोप करणाऱ्या महिलेचे घूमजाव



मुंबई. ( विशेष प्रतिनिधी ) – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप करणाऱ्या महिलेने चोवीस तासाच्या आतच घूमजाव केले. सदाभाऊ हे माझ्या विरोधी गटाला मदत करत असल्याच्या मानसिकतेतून ‘तो’ आरोप केल्याचं तक्रारदार महिलेने पोलिसांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणात कुठलेही तथ्य नाही, ‘त्या’ महिलेने पुराव्यानिशी आरोप केलेले नाहीत, त्यामुळे यावर बोलणे योग्य नाही. याबाबत माझ्यापर्यंत अद्याप काहीही आलेले नसल्याची प्रतिक्रिया राज्यमंत्री खोत यांनी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.

काल एका महिलेने सांगलीत पत्रकार परिषद घेऊन राज्यमंत्री खोत यांच्यावर बलात्काराचा गंभीर आरोप केला होता. मात्र, याबाबत ती महिला कुठलाही पुरावा देऊ शकलेली नाही. त्या महिलेचे दुसर्‍या गटातील लोकांसोबत वैयक्तिक भांडण आहे. त्या दुसर्‍या गटाला राज्यमंत्री खोत हे मदत करत असल्याच्या मानसिकतेतून आपण ‘तो’ आरोप केल्याचं या महिलेने आज  (30 जुलै) पोलिसांना लिहून दिले. दरम्यान, या महिलेने आधी थेट आरोप आणि त्यानंतर अचानक केलेला घूमजाव यामुळे ‘ती’ महिलाच आता संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यामुळे कुणाच्या सांगण्यावरून  ती खोटे बोलली,  याची चर्चा आता सुरू झाली आहे.





पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर



मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111












  


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *