👁 7 Views

कु . प्रगती खांडेकर म्हणजे मंगळवेढेकरांचा अभिमान : कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल 
 Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live 


युटोपियन शुगर्स  ने केले प्रगतीचे अभिनंदन 

 प्रतिनिधी :- डोणज  ता. मंगळवेढा  येथील  कु . प्रगती  आमसिध्द  खांडेकर  हिने  कोलंबो , श्रीलंका  येथे स्टुडन्ट ऑलिम्पिक  स्पर्धेत ३००० हजार  मीटर  धावणे या प्रकारात  गोल्ड मेडल मिळवल्याने  मंगळवेढेकरांची  मान  उंचावली असून कु.प्रगती  खांडेकर  म्हणजे  मंगळवेढेकरांचा  अभिमान असल्याचे मत युटोपियन शुगर्स चे कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील यांनी  व्यक्त केले . 
                     तिच्या  या भरघोस  यशा बद्दल  नेहमीच सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या युटोपियन शुगर्स ने प्रगतीच्या कोलंबो येथील प्रवास खर्चाकरिता कारखान्याचे मार्गदर्शक व जिल्ह्याचे आमदार मा. प्रशांतराव परिचारक यांच्या सूचनेवरून रक्कम रुपये १००००/- ची रोख मदत केली होती . प्रगतीने त्याचे चीज केले आहे . युटोपियन च्या  वतीने कु. प्रगतीचा अभिनंदन पर सत्कार  आयोजित केला होता. सदर  प्रसंगी  कार्यकारी संचालक उत्तमराव पाटील बोलत होते . 
                      पुढे बोलताना कार्यकारी संचालक पाटील म्हणाले की ,विद्यार्थ्यांनी  केवळ शैक्षणिक गुणवत्तेच्या मागे न लागता शैक्षणिकप्रगती बरोबरच विविध क्रीडा प्रकारा मध्ये कु. प्रगती सारखी गुणवत्ता सिद्ध करावी. तीने मिळवलेले यश हे असाधारण असे असून निश्चितच इतर खेळाडूंनी आदर्श घ्यावा असे आहे . तिच्या भावी वाटचालीस युटोपियन चे नेहमीस सहकार्य  राहील असे सांगून श्री पाटील यांनी युटोपियन च्या वतीने कु. प्रगतीस शुभेच्छा दिल्या . 
                            सदर प्रसंगी युटोपियन शुगर्स चे सर्व खाते प्रमुख व अधिकारी वर्ग उपस्थित होता.

…………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *