पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
………………………………………………..
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 3 August 2017
पंढरपूर, दि. 03 :- शासनाच्या खादी ग्रामोद्योग विभागाकडून घेतलेले कर्ज तसेच बिनशेती सारा न भरलेला तालुक्यातील खातेदारांच्या गहाण संपत्तीचा लिलाव 6 सप्टेंबर 2017 रोजी तहसिल कार्यालय, पंढरपूर येथे करण्यात येणार आहे. हा लिलाव महाराष्ट्र जमिन महसूल संहिता 1966 च्या कलमान्वये थकबाकीदारांना क्रमांक 1 व 2 ची नोटीस देऊन आणि कलम 180 अन्वये थकबाकीदारांना क्रमांक 3 ची नोटीस देऊन जप्त केलेल्या मालमत्तेचा लिलाव करण्यात येत आहे. जाहीर लिलावातून प्राप्त होणाऱ्या रक्कमेतून आरआरसीची रक्कम शासन जमा करण्यात येणार असल्याचे तहसिलदार मधुसूदन बर्गे यांनी कळविले आहे.
दिनांक 6 सप्टेंबर रोजी लिलाव करण्यात येणा-या मालमत्तेचा तपशील पुढील प्रमाणे: अनिल यशवंत कोरके, रा. भोसे यांच्या गट नं-433/3 मधील 0-75 चौ.मी ( वसूलपात्र रक्कम 218470/- तर दुय्यम निबंधक यांच्याकडील मूल्यांकन 876000/-), दिलीप किसन वाखरकर, रा.हरिदास वेस, पंढरपूर यांच्या गट.नं. 2075/1 मधील 5.00 चौ.मी ( वसूलपात्र रक्कम 28770/- तर दुय्यम निबंधक यांच्याकडील मूल्यांकन 20100/-), इब्राहीम बशीर बोहरी रा. पंढरपूर यांच्या स.न.3099/1/11, 3398/6/7/32 मधील 194.78 चौ.मी ( वसूलपात्र रक्कम 89237/- तर दुय्यम निबंधक यांच्याकडील मूल्यांकन 955000/-),तर महादेव रामा होनकळसे रा. पुळूजवाडी व नारायण भानुदास घोडके रा.औंढी. ता. मोहोळ यांच्या मौजे पुळूज येथील जमीन ग.नं.241/2 मधील हे.1.00 आर ( वसूलपात्र रक्कम 183565/-तर दुय्यम निबंधक यांच्याकडील मूल्यांकन 7125000/-) अशी आहे.
या खातेदारांनी शासनाकडून घेतलेले कर्ज परत करण्यास कसूर केली असल्याने त्यांच्या गहाण संपत्तीचा लिलाव करण्यात येत आहे. लिलावाच्या दिवशी खरेदीदार म्हणून जाहीर केलेल्या व्यक्तीस त्याने बोली केलेल्या रक्कमेच्या 25 टक्के अनामत रक्कम तात्काळ भरावी लागेल. लिलाव करण्यात येणाऱ्या मालमत्तेची संपूर्ण माहिती आवश्यक असल्यास तहसिल कार्यालय पंढरपूर येथील जमा-2 संकलन विभागाशी संपर्क साधावा. तसेच लिलावात भाग घेऊ इच्छिणाऱ्या व्यक्तीनी लिलावाच्या दिवशी सकाळी 11.00 वाजले पासून उपस्थित रहावे असे तहसिलदार मधुसूधन बर्गे यांनी कळविले आहे.
…………………………………………………………………………..…………………………………………..
……………………………………………………………………………………………………………………….
……………………………………………………………………………………………………………………….
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111




