👁 7 Views

पंढरपूरमध्ये स्वयंघोषीत वारकरी नेत्यांचे आंदोलन स्वार्थापोटी..!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

 ………………………………………………..

पंढरपूर Live 4 August 2017


पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरपूरमध्ये कांही स्वयंघोषीत वारकरी नेत्यांनी केलेले आंदोलन हे स्वार्थापोटी असून या आंदोलनकर्त्या स्वयंघोषीत वारकरी नेत्यांच्या भुमिकेमागे कोणतीही नितीमत्ता नाही. वारकरी सांप्रदायामध्ये नैतीकतेला, सत्याला आणि नि:स्सीम विठ्ठल भक्तीला अनन्यसाधारण महत्व आहे. परंतु सध्या मंदिर समितीचे अध्यक्ष व सदस्य निवडीला विरोध करणार्‍या कांही स्वयंघोषीत वारकरी नेत्यांना या सर्व बाबींचा विसर पडलेला दिसून येत आहे. यांना पंढरीतील वारकर्‍यांच्या सोयी-सुविधा अथवा विविध संतांच्या पालखी सोहळ्यातील अडीअडचणीसंदर्भात कांहीही देणेघेणे नसून केवळ यांना मंदिर समितीचे सदस्यपद भोगायचे आहे. विठ्ठलभक्तीत तल्लीन होणार्‍या वारकर्‍यांना ऐन एकादशीच्या दिवशी हे स्वयंघोषीत वारकरी नेते विठ्ठलाच्या समोरच आंदोलनाला बसवून राजकारण करताना दिसत आहेत. ही बाब खेदजनक आहे.
संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या विश्‍वस्त नेमणुकीच्या वेळी हेच आंदोलनकर्ते कुठल्या बिळा लपून बसले होते. आज जे काहीजण स्वत:ला वारकर्‍यांचे नेते म्हणवून मिरवत आहेत, त्यांची पंढरपूर संस्थानच्या विश्‍वस्तपदी निवड न झाल्याने दुखावले गेले आहेत. त्यांच्या या दुखण्यातूनच आंदोलनाचा उगम झाला आहे. सध्या नेमलेल्या मंदिर समितीच्या सदस्य व अध्यक्षांवर त्यांना कामाची संधी न देताच अविश्‍वास दाखवण्याचा यांचा प्रयत्न चुकीचा आहे. नव्याने मंदिर समिती नियुक्ती केली आहे. नव्या सदस्यांना व अध्यक्षांना काम तर करु द्या..? त्यांच्या कामाची पध्दत तर बघा..? त्यांनी केलेले नियोजन पण बघा की..? की उगाच स्वत:चा स्वार्थ साधला नाही म्हणुन राजकारण्यांसारखा विरोधाला विरोध करत आहात..? तुम्ही करत असलले आंदोलन म्हणजे वारकर्‍यांची दिशाभुल आहे. आज त्र्यंबकेश्‍वरचे संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज संस्थानच्या अनेक विश्‍वस्तांना साधा हरिपाठसुध्दा येत नाही. तेथे आवाज उठविण्यास तुम्ही का धजावत नाहीत? पंढरपूरच्या मंदिर समितीला विरोध करण्याचा नैतीक आधिकार तुम्हाला कोणी दिला? आमच्या या प्रश्‍नाची उत्तरे देता आली तर द्या नक्कीच!
अखिल विश्‍व वारकरी परिषदेच्या वतीने आम्ही शासन नियुक्त श्रीविठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती च्या नुतन अध्यक्ष व सदस्यांच्या निवडीचे या प्रसिध्दीपत्राच्या माध्यमातून समर्थन करत आहोत. व आंदोलनकर्त्या स्वयंघोषीत वारकरी नेत्यांचा जाहीर निषेध व्यक्त करत आहोत.
नितीन सातपुते 
(प्रदेशाध्यक्ष, अखिल विश्‍व वारकरी परिषद, महाराष्ट्र राज्य) 
मो. 9822452278 

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….

……………………………………………………………………………………………………………………….


पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *