पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 7 August 2017
सोलापूरच्या भगिनींनी पंतप्रधानांना पाठवली राखी.. मोदींकडून आली अनोखी भेट!!
सोलापूर – रक्षाबंधनहा बहीण भावाच्या पवित्र नात्याचा दिवस. सोलापुरातील दोन भगिनींनी सहज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना राखी पाठवली आणि चक्क या दोघींना मोदी यांनी प्रत्युत्तर देत एक चांगला विचार रुजवण्याची भेट पाठवली आहे. विशेष म्हणजे मागील दोन वर्षांपासून अशा प्रकारची भेट येत आहे.
भारताच्या पंतप्रधानपदी तीन वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी विराजमान झाले. या वेळी सोलापुरातील पूजा रेवणकर आणि टीना दिवाकर यांनी प्रतिवर्षी सैनिकांना राख्या पाठवण्याच्या संकल्पनेत थोडासा बदल करीत पंतप्रधानांनाही एकेक राखी पाठवली. या पत्राला उत्तर म्हणून पंतप्रधान कार्यालयातून लगेच राखीपौर्णिमेच्या दिवशी प्रत्युत्तर आले. यातील अजून एक वेगळेपण म्हणजे प्रत्येक वर्षी पंतप्रधान मोदी सोलापुरी भगिनींना स्वहस्ताक्षरातील एक आभारपत्र आणि एक भेट वस्तू पाठवतात. या भेटवस्तूंमध्ये एक सुंदर विचार असतो.
अशी आहे यंदाची भेट
यंदाच्या वर्षी मोदी यांच्याकडून एक फोटो फ्रेम भेट म्हणून आली आहे. यामध्ये महात्मा गांधीजींच्या प्रेरणेने प्रेरित झालेले मोदींचे विचार आहेत. तसेच स्वच्छ भारत मिशनचा सोनेरी रंगाचा लाेगो असणारा चष्मा आहे. तसेच आपला घर परिसर स्वच्छ ठेवा, शहराचे सौंदर्य वाढेल असा संदेश आहे.
पत्रातील मजकूर
मागील दोन वर्षात हिंदी इंग्रजीमधून पत्रे आलेली आहेत. एका पत्रात रक्षासूत्र असणाऱ्या राखीपौर्णिमेला पाठवलेली राखीचा आम्ही मनस्वी स्वीकार करू. तसेच आपले घर, परिवार स्वस्थ राहण्यासाठी योगदान गरजेचे आहे. समस्त भारतवर्षाला स्वच्छतेच्या धाग्यात गुंफण्यासाठी आपल्यासारख्या बहिणींची गरज असल्याचे यात म्हटले आहे.
खूप आनंद वाटला
^पंतप्रधानपदी विराजमान झाल्यापासून विकासासाठी कायम परदेश दौऱ्यावर पंतप्रधानांनी वेळात वेळ काढून सोलापूरसारख्या एका छोट्या गावातील बहिणीच्या पत्राला उत्तर दिले, हीच आनंददायी गोष्ट आहे. त्यातच त्यांनी दिलेला भेटरूपी संदेश खूप अमूल्य आहे.” टीना दिवाकर
सोलापूरच्या भगिनींनी पंतप्रधानांना पाठवली राखी; आली अनोखी भेट
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


