पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व
Android Application
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुंबई-मराठा मोर्चात राजकीय भाषणं होणार नसल्याचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्पष्ट केले. मराठा समाजाचे एक शिष्टमंडळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार असून त्यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मोर्चाचा उद्देश
मराठा आरक्षणाबाबत ठोस निर्णय व्हावा, यासाठी हा मोर्चा काढण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण हीच मुख्य मागणी असल्याचे सांगतानाच जेवढे मुख्यमंत्री झाले ते मराठा समाजाचेच होते, त्यांनी दुसऱ्या समाजाला आरक्षण देताना सहकार्य केल्याचे त्यांनी नमूद केले. सर्व जातीधर्माच्या नागरिकांनी मराठा समाजाच्या मागणीला पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आरक्षण मिळेल असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. विधीमंडळात असलेले मराठा समाजाचे नेते याबाबत आवाज उठवतील, असे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. राणीचा बाग-जे जे मार्गाने-आझाद मैदान असा मार्ग असणार असून त्यानंतर एक शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना निवेदन देईल, असे त्यांनी सांगितले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



