👁 6 Views

मटका जुगारावर कारवाई करु नये म्हणून पंढरीत झाली पोलिसांनाच दमदाटी..!

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व
 Android Application 

 सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर


पंढरपूर Live 8 August 2017

पंढरपूरमध्ये आज मटका जुगारावर कारवाई करु नका म्हणत एका चक्क पोलिसांनाच दमदाटी केल्याची घटना आहे. याबाबत शहर पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की आज दि. 8/8/2017 रोजी सकाळी 11 वाजणेच्या सुमारास पंढरपूर शहर पोलिस ठाणेचे हे.कॉ. सुजित एकनाथ उबाळे हे अवैध धंयावर केसेस करण्यासाठी संत पेठेत पेट्रोलिंग करत होते. तेंव्हा प्रदीप भगवान यादव यांचे घरामागे, महापूर चाळ, संतपेठ येथे एकजण मटका घेत असल्याची माहिती त्यांना समजली. तेथे गेल्यानंतर तिथे एक इसम चिठ्ठ्यावर आकडेमोड करत असताना दिसला. तेंव्हा त्याचेवर कारवाई करताना  तिथे किशोर खिलारे, रा. महापूर चाळ, संत पेठ हे आले. याच्यावर मटका केस करुन नका असे म्हणत खिलारे यानी हे.कॉ.उबाळे व त्यांच्या सोबतच्या कर्मचार्‍यांना दमदाटी व अरेरावी करत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा  पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात नोंदवला गेला आहे.

अधिक तपास पोसई गोसावी हे करीत आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live 

वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111


Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *