पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व Android Application
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live
मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399
mail- livepandharpur@gmail.com
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
………………………………………………..
पंढरपूर Live 11 August 2017
मराठा क्रांती मोर्चा आटोपून मुंबईहून औरंगाबादसाठी निघालेल्या 2 कार आणि एका ट्रकचा भीषण अपघात झाला. नाशिकजवळ झालेल्या या अपघातात 5 जणांचा चेंदामेंदा झाला. तसेच 6 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही कारचा चुराळा झाला. तसेच ट्रकच्या समोरचे दोन चाक गायब होऊन ट्रक समोरून पूर्णपणे वाकला आहे.मुंबई: मुंबईतील मराठा मोर्चात सहभागी होऊन घरी परतणाऱ्या 5 जणांचा अपघाती मृत्यू झाला. मुंबईतील वडाळ्यात काल संध्याकाळी ट्रकने दिलेल्या धडकेत चेंबूरमधल्या दोघांचा मृत्यू झाला.
तर तिकडे येवला-औरंगाबाद मार्गावर झालेल्या तिहेरी अपघातात तिघांचा मृत्यू झाला. याच अपघातात चार जण गंभीर जखमी झाले आहेत.
विशेष म्हणजे हे सातही जण मुंबईतला कालच्या मराठा मूकमोर्चावरून घरी परतत होते. यावेळी ट्रक आणि 2 कारमध्ये सकाळी 7 च्या सुमारास अपघात झाला. हा अपघात खामगाव पाटीजवळ झाला, ज्यात तिघांनी आपला जीव गमावला.
मुंबईत मराठा मोर्चा
देशाची आर्थिक राजधानी मराठा मोर्चामुळे भगवी झाली आणि त्याचा परिणामही अवघ्या काही तासात दिसून आला. भायखळा ते आझाद मैदानादरम्यान लाखोंच्या मराठा समाजानं केलेल्या मूक मोर्चानंतर मुख्यमंत्र्यांनी कोपर्डी बलात्कार प्रकरण, आरक्षण, शिक्षण आणि इतर मागण्यांवर महत्वाच्या घोषणा केल्या.
त्यानुसार कोपर्डीचं प्रकरण कोर्टात अंतिम टप्प्यात आहे, त्याचा निकाल लवकरच लागेल.
आरक्षणाचं प्रकरण मागासवर्गीय आयोगाच्या कोर्टात आहे, त्यांनी ते कालमर्यादेत पूर्ण करावं अशी विनंती आपण करु. तसंच ओबीसींना 605 अभ्यासक्रमात मिळणाऱ्या सवलती मराठा आणि मुस्लिम समाजालाही देऊ असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं.
मुख्यमंत्र्यांची घोषणा
कोपर्डी प्रकरण अंतिम टप्प्यात, लवकरच निकाल लागेल
आरक्षण प्रकरणी मागासवर्गीय आयोग कालमर्यादेत काम पूर्ण करेल
605 अभ्यासक्रमात मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती
मराठा विद्यार्थ्यांना ओबीसींप्रमाणेच 50 टक्के गुणांची मर्यादा राहील
प्रत्येक जिल्ह्यात मराठा विद्यार्थ्यांची स्वतंत्र वसतिगृह उभारणार
वसतिगृह उभारण्यासाठी प्रत्येक जिल्ह्याला 5 कोटी रुपयाचा निधी
एमएच 20 ईई 7264 या गाडीची ट्रकशी टक्कर होऊन अपघाती निधन झालेल्या नारायण थोरात,अविनाश गव्हाणे,गौरव प्रजापती या औरंगाबाद जिल्ह्यातील मावळ्यांना दु:खद अंतकरणाने श्रद्धांजली!*
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!
पंढरपूर Live
वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111



