👁 5 Views

अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या परप्रांतीय तरूणाला अटक

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल
 व Android Application पंढरपूर Live 
येथे आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..
परिणाम बघा..!!

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,

  • पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 19  August 2017 

पुणे, दि. 19 (प्रतिनिधी) – अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी परप्रांतीय तरूणाला भोसरी पोलिसांनी अटक केली. त्याला 24 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश विशेष न्यायालय आर.एन. अदोणे यांनी दिला आहे.
वहिद फतेह खान ऊर्फ मोनू शेख (वय 23, रा. भोसरी, मूळ. उत्तरप्रदेश) असे पोलीस कोठडी झालेल्यांचे नाव आहे. याबाबत 16 वर्षीय मुलीच्या आईने पोलिसात फिर्याद दिली आहे. मार्च महिन्यात भोसरी परिसरात हा प्रकार घडला.

 पीडित मुलगी उर्दू परीक्षेसाठी चिंचवड येथील एका विद्यालयात गेली होती. तिथे पाणी पिल्यानंतर ती बेशुध्द झाली. त्यावेळी वहिद याने तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर वहिद याने त्याच्या घरी नेवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केल्याचे फिर्यादीत नमुद करण्यात आले आहे. पीडित मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उजेडात आला. या प्रकरणी पोलिसांनी वहिद याला अटक करून न्यायालयात हजर केले. त्यावेळी वहिद याची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी त्याला पोलीस कोठडी देण्याची मागणी अतिरिक्त सरकारी वकिलांनी केली. ही मागणी ग्राह्य धरत न्यायालयाने वहिद याला पोलीस कोठडी सुनावली.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *