👁 12 Views

मंत्रिमंडळ बैठक, दि. 23 ऑगस्ट 2017 एकूण निर्णय- ४

11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 23 August 2017 


    गोरेवाडा वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी १० पदांना मंजुरी
                नागपूर येथील गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयांतर्गत वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्रासाठी १० पदे निर्माण करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
                गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणिसंग्रहालयात महाराष्ट्र पशू व मत्स्यविज्ञान विज्ञापीठ यांच्या नियंत्रणाखाली वन्यजीव संशोधन व प्रशिक्षण केंद्र स्थापन करण्यात आले आहे. या केंद्रासाठी एकूण २० पदांची गरज होती. यापूर्वी १० पदे निर्माण करण्यात आली असून उर्वरित १० पदांना आज मंजुरी देण्यात आली. या मंजूर पदांमध्ये संचालकउपसंचालकविषयतज्ज्ञ अशी नियमित स्वरुपातील सहा पदे आहेततर तांत्रिक स्वरुपाची उर्वरित चार पदे बाहेरून  भरण्यात येणार आहेत.
                राज्यातील निरनिराळ्या भागात नोंद झालेल्या आजारी वन्यजीवांवर उपचार करणेमानवी वस्तीमध्ये शिरकाव केलेल्या वन्यजीवांना बधिरीकरण करुन पकडणेसुरक्षित स्थळी हलविणे,वन्यजीव प्रजाती ओळखसहाय्य-प्रजोत्‍पादनवन्यजीव संवर्धन संशोधन व प्रशिक्षणआजारी व पकडलेल्या वन्यजिवांचे पुनर्वसन इत्यादी उद्द‍िष्टांचा या केंद्रामध्ये समावेश आहे.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    —-0—-
      
    अध्यादेश पुन:प्रख्यापित करण्याचा निर्णय
    कृषि उत्पन्न बाजार समित्यांसाठी
    पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार
    कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकीत पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार देण्यासाठी राज्य शासनाने 13जून 2017  रोजी प्रख्यापित केलेला अध्यादेश पुन:प्रख्यापित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
    कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीमध्ये पात्र शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्यासाठी  महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम-1963 मधील कलम  2, 13  व  14 मध्ये सुधारणा करण्यासाठी 13 जून 2017 रोजी प्रख्यापित केलेला महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक 9  मधील तरतुदी पुढे सुरू ठेवण्यासाठी आणि या अद्यादेशान्वये करण्यात आलेल्या कार्यवाहीस संरक्षण देण्यासह हा अध्यादेश पुन:प्रख्यापित करण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे.
    —–०—–

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    कुपोषण रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना
    राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रात
    30 हजार ग्राम बाल विकास केंद्र
    कुपोषणाच्या समस्येवर मात करण्यासाठी राज्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील अंगणवाडी केंद्रांमध्ये ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यास मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. त्यानुसार राज्यात एकूण 30 हजाराहून अधिक केंद्र स्थापन करण्यात येणार आहेत. राज्यातील आदिवासी क्षेत्रातील अंगणवाड्यांमध्ये यापूर्वीच महिला व बाल विकास विभाग आणि आदिवासी विकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ग्राम बाल विकास केंद्र स्थापन करण्यात आली आहेत.
    यापूर्वी केंद्र शासनाच्या माध्यमातून अति तीव्र कुपोषित (सॅम) बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र योजना आरोग्य विभागाकडून राबविण्यात येत होती. परंतुकेंद्र शासनाकडून मिळणारा निधी बंद झाल्याने ही योजना बंद करण्यात आली होती. ग्रामीण भागात कुपोषण रोखण्यासाठी योजनेची आवश्यकता लक्षात घेऊन राज्य शासनाने ही योजना पुन्हा राबविण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार बिगर आदिवासी क्षेत्रातील 20 जिल्ह्यांमधील91 हजार 45 पैकी 30 हजार 348 अंगणवाड्यांमध्ये अतितीव्र कुपोषित बालकांसाठी ग्राम बाल विकास केंद्र सुरु करण्याचा निर्णय आज घेण्यात आला आहे.
    योजनेंतर्गत अंगणवाडी स्तरावर प्राथमिक चाचणीच्या माध्यमातून अति तीव्र कुपोषित (सॅम) बालकांची विस्तृत तपासणी केली जाईल. तसेच काही विकार झालेल्या अथवा वैद्यकीय मदतीची आवश्यकता भासणाऱ्या बालकांना पुढील उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या निदर्शनास आणण्यात येईल. इतर सॅम बालकांना ग्राम बाल विकास केंद्रात प्रवेश देण्यात येईल. यात सहा महिन्यांपासून ते सहा वर्षापर्यंतच्या बालकांचा समावेश असेल. यातील सहा महिने ते तीन वर्षांच्या बालकांना त्यांचे पालक अंगणवाडीत घेऊन येतीलतर तीन ते सहा वर्ष वयोगटातील बालकांची अंगणवाडी सेविका व मदतनीस या देखभाल करतील.
    योजनेच्या माध्यमातून सॅम बालकांचा सर्वंकष विकास सुनिश्चित करणेऔषधोपचारांचा परिणाम दिसून न येणाऱ्या सॅम बालकांची सविस्तर तपासणी करणेजिल्हा परिषदेच्या एकात्मिक बालविकास योजना (आयसीडीएस) आणि आरोग्य खात्याच्या माध्यमातून सॅम बालकांच्या पालकांचे समुपदेशन करुन बालकांची काळजी घेणे ही उद्दिष्ट्ये साध्य करण्यात येणार आहेत. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी महिला व बाल‍ विकास विभागासाठी 21 कोटी 19 लाख 64 हजार रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यास सुद्धा मान्यता देण्यात आली.
    —–०—–
    वृ.वि. 6449                                                                              02 भाद्रपद, 1939 (दु. 3.25 वा.)
                                                                                                    दि. 23 ऑगस्ट, 2017

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    अन्य राज्यांच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यांचा समावेश
    आता विशेष अधिकाऱ्यांमार्फत होणार
    पीसीपीएनडीटी’ कायद्याची प्रभावी अंमलबजावणी
    आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत
    ·     गर्भपातासाठी लागणारे मेझॉप्रोस्ट औषध शेड्युल एच’ मध्येच ठेवणार
    ·     आंतरराज्य सीमाभागात सोनोग्राफी करतेवेळी रुग्णाच्या वास्तव्याचा पुरावा घेण्याबाबत विचार करणार
    ·     सोनोग्राफी मशीनला ट्रॅकर बसविणे योग्य होणार नाही
    ·     गर्भपात केंद्रांना नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र ठळकपणे लावणे बंधनकारक करणार
    मुंबईदि. 23 मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असलेल्या आणि गर्भलिंग निदान चाचण्यांसाठी संवेदनशील असणाऱ्या जिल्ह्यात तसेच अन्य राज्यांच्या सीमेलगत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये पीसीपीएनडीटी कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीकरिता विशेष अधिकारी नेमण्यात यावा. आंतरराज्य सीमाभागात सोनोग्राफी करतेवेळी रुग्णाच्या वास्तव्याचा पुरावा घेण्याबाबत विचारविनिमय करावाअसे निर्देश आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी काल येथे दिले.
    मंत्रालयात गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान चाचणी प्रतिबंधात्मक कायद्याच्या (पीसीपीएनडीटी) राज्य समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी आरोग्यमंत्री बोलत होते. समिती सदस्य व आमदार नीलम गोऱ्हेभारती लव्हेकरआरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यासआरोग्य संचालक डॉ. सतीश पवार उपस्थित होते.
    गर्भपातासाठी आवश्यक असणारे मेझॉप्रोस्ट औषध शेड्युल एच’ मध्येच ठेवण्यात येईल. गर्भवती मातेची आरोग्य चाचणीसाठी सोनोग्राफी करताना गर्भलिंगाबाबत कुणालाही माहिती देण्यात येऊ नये. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक तत्वांचा विचार करता सोनोग्राफी मशीनला ट्रॅकर बसविणे योग्य होणार नाहीअसे महत्वपूर्ण निर्णय यावेळी घेण्यात आले.
    गर्भ लिंगनिदास प्रतिबंध न करता त्याची माहिती संबंधितांना द्यावी व मुलीचा गर्भ असल्यास संबंधित माता-पित्यावर लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा करावीअशी चर्चा होत असल्याचे सांगत समितीच्या सदस्यांनी याविषयाकडे आरोग्यमंत्र्यांचे लक्ष वेधले. गर्भलिंगनिदान चाचणी करू देणे हे कायद्याच्या कक्षेत बसणारे नसून गर्भवती मातेच्या आरोग्य तपासणीसाठी सोनोग्राफी केल्यानंतर डॉक्टरांनी त्या महिलेस किंवा कुटुंबियास गर्भलिंगाबाबत कुठलीही माहिती देता कामा नयेअसे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले.
    राज्यातील 9 तालुक्यात करण्यात आलेल्या प्राथमिक सर्वेक्षणात मुलींच्या जन्माचे प्रमाण कमी असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे पीसीपीएनडीटी कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावी होण्याकरिता विशेष अधिकारी नेमण्यात यावा त्याच्या माध्यमातून याबाबत सातत्याने आढावा घेतला जाईल. सहायक संचालक दर्जाचा अधिकारी यासाठी नियुक्त करण्यात यावाअसे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी  यावेळी दिले. अन्य राज्यांच्या सीमेलगतच्या भागांमध्ये आणि गर्भलिंग निदानाच्या केसेसमध्ये संवेदनशील असलेल्या जिल्ह्यांमध्ये प्राधान्याने हा उपक्रम राबवावा.
    अन्य राज्यांच्या सीमा भागात सोनोग्राफी करण्यासाठी गेलेल्या अथवा आलेल्या रुग्णाकडून वास्तव्याच्या पुरावा घेण्यात यावा जेणे करून परराज्यातील सीमाभागात होणारे गर्भलिंगनिदानाचे प्रमाण आटोक्यात येईल.
    गर्भपात केंद्रांना नोंदणीकृत असल्याचे प्रमाणपत्र ठळकपणे लावणे बंधनकारक करता येईल काराज्यातील विशीष्ट भागात,जिल्ह्यात तसेच तेथील विशिष्ट डॉक्टर यांच्याकडून गर्भपाताची औषधे जास्त प्रमाणात लिहून दिली जातात काराज्याच्या कुठल्या भागात गर्भपात औषधांचा जास्त पुरवठा होतोय किंवा मागणी होतेय यासाठी ट्रँकींग व्यवस्था निर्माण करावी असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
              अनधिकृत दवाखानेडॉक्टर्स यांच्यावर कारवाई करण्यासाठी वर्षभरातून एकदा धडक मोहिम हाती घ्यावीअसे निर्देशही त्यांनी दिले.
    ००००
    अजय जाधव..23.8.2017
    वृ.वि. 6450                                                                              02 भाद्रपद, 1939 (दु. 3.35 वा.)
                                                                                                    दि. 23 ऑगस्ट, 2017

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    सौहार्दपूर्ण व सलोख्याच्या वातावरणात बकरी ईद साजरी करावी
    – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
    मुंबईदि. 23 : शांततेतसौहार्दपूर्ण तसेच सलोख्याच्या वातावरणात बकरी ईद साजरी करावीअसे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले. 
    बकरी ईद निमित्त कायदा सुव्यवस्था तसेच इतर सोयी सुविधाचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालयात आढावा घेतला. यावेळी अल्पसंख्याक मंत्री विनोद तावडेपरिवहन मंत्री दिवाकर रावतेपशुसंवर्धन मंत्री महादेव जानकरआमदार सर्वश्री आशिष शेलारअबू आझमीअमीन पटेल, वारिस पठाणअस्लम शेखजितेंद्र आव्हाडहुसेन दलवाईगृह विभागाचे अपर मुख्य सचिव सुधीर श्रीवास्तवप्रधान सचिव रजनीश शेठपोलीस महासंचालक सतीश माथूरमुंबईचे पोलीस आयुक्त दत्ता पडसलगीकरबृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त अजोय मेहता,मुंबई शहरचे जिल्हाधिकारी संपदा मेहताउपनगरचे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह आदी उपस्थित होते.
    बकरी ईद निमित्त मुंबईमध्ये देण्यात येणाऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेऊन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी पोलीसांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच याकाळात नागरिकांच्या मदतीसाठी मुंबईसाठी 7045757272 तसेच राज्यातील इतर भागासाठी 9503511100 हे दोन हेल्पलाईन सुरू करण्यात आले आहेत. या सुविधेचा वापर करावाअसेही त्यांनी सांगितले.
    मुंबईतील देवनार पशुवध गृहात महापालिकेच्या वतीने सुविधा देण्यात आल्या आहेत. तसेच पशू खरेदी करण्यासाठी माहिती देण्याची सुविधा ऑनलाईन तसेच ऑफलाईन करण्यात आली असल्याचेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *