👁 6 Views

शहर कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंदिर समिती विरोधात आंदोलनाचा इशारा

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!


11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले 
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल

पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी

मुख्य संपादक– भगवान वानखेडे संपर्क- 8308838111/8552823399

mail- livepandharpur@gmail.com

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    पंढरपूर Live 25 August 2017 


    शहर कॉंग्रेस, संभाजी ब्रिगेडच्या वतीने मंदिर समिती विरोधात आंदोलनाचा इशारा

    पंढरपूर शहर कॉंग्रेस कमिटी व संभाजी ब्रिगेड पंढरपूर यांच्या वतीने विविध मागण्यांसाठी पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी संजय तेली यांना निवेदन देण्यात आले.यावेळी मंदिर समितीच्या सदस्या शकुंतला नडगिरे उपस्थितीत होत्या. 
    मंदिर समितीच्या जागेवर सुरु असलेल्या भक्त निवासाचे बांधकाम हे वाळू न वापरता कचखडी वापरून चालू आहे. ते तात्काळ बंद करा व मंदिरामध्ये दर्शनासाठी येणार्‍या भक्तांसाठी वयोवृध्द, अपंग, विकलांग भक्तांना दर्शनासाठी विलचेअर वापरुन सुलभ दर्शनाची सोय करावी. आदी मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
    यावेळी पंढरपूर शहर कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष ऍड. राजेश भादुले, नागेश गंगेकर, संदिप माने, गणेश माने, ऊपळकर गुरुजी, द.ह.बडवे, सुहास भाळवणकर, एन.एस.यु.आय चे महेश बोचरे, नगरसेवक अशिष डोंबे, दिपक येळे, प्रा.सुदर्शन मसूरे, संदिप पाटील, किरणराज घाडगे, आप्पासाहेब माळी, स्वागत कदम, बाळासाहेब बागल, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष आकाश मांडवे, भगवान महाराज बागल, सोमनाथ गांडूळे, आकाश माने, आकाश कदम, अमोल कदम, राजाभाऊ वाघमोडे, पुरुषोत्तम देशमुख, संदिप मुटकूळे, दत्तात्रय झरकर, मारुती भोसले आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
    याप्रसंगी शहर कॉंग्रस अध्यक्ष ऍड.राजेश भादुले व संभाजी ब्रिगेडचे किरणराज घाडगे यांनी मंदिर समितीमध्ये चाललेल्या गैरकारभाराबाबत कार्यकारी अधिकारी संजय तेली यांना सर्व बाबी पटवून सांगीतल्या. त्यावर त्यांनी गांभीर्याने विचार करुन लवकरात लवकर निर्णय घेवू असे आश्‍वासन दिले. यावेळी उपस्थितांचे आभार सेवादलचे शहराध्यक्ष गणेश माने यांनी मानले.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!

    पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,
    पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *