👁 6 Views

जपानने पर्यटन क्षेत्रात गुंतवणुक करावी – पर्यटनमंत्री जयकुमार रावल

गणेशोत्सवानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  

मुख्य संपादक– भगवान वानखेडे   

Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  

mail-livepandharpur@gmail.com

web – http://www.pandharpurlive.com 

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

पंढरपूर Live 29 August 2017 

    मुंबई,  जपानने महाराष्ट्रातील पर्यटनपायाभूत सुविधा निर्मितीतंत्रज्ञानस्मार्ट सिटी आदी क्षेत्रामध्ये गुंतवणूक करावीअसे आवाहन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी जपानमधील वाकायामा शासनाच्या शिष्टमंडळाला केले.
                जपानमधील वाकायामा शासनाच्या शिष्टमंडळाने आज पर्यटनमंत्र्यांची यांची मंत्रालयात भेट घेतली. या भेटीत विविध विषयांवर चर्चा झाली. या शिष्टमंडळाचे नेतृत्व वाकायामा शासनाच्या आंतरराष्ट्रीय नियोजन विभागाचे महासंचालक हिरोयुकी त्सुई यांनी केले. शिष्टमंडळात ओनीशी तात्सुनोरीकाझुओ यामासाकीमसाकी शिमीझुइतारु ताकाहाशीहिडेकाझु हिराईश्रीमती चिनात्सु साकामोटोयुमी नाकामोटोताईको मिनामी यांचा समावेश होता. महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे (एमटीडीसी) व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारेपर्यटन विभागाचे सह सचिव दिनेश दळवीएमटीडीसीचे सह व्यवस्थापकीय संचालक आशुतोष राठोडउप महाव्यवस्थापक चंद्रशेखर जयस्वाल आदी उपस्थित होते.
                येत्या जानेवारी 2018 मध्ये वाकायामाचे गव्हर्नर भारतामध्ये तसेच महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने विविध सामंजस्य करार होणार आहेत. या सामंजस्य करारामध्ये पर्यटन क्षेत्रातील वृद्धीनाशिक शहराच्या अनुषंगाने शेती तसेच अन्न प्रक्रिया उद्योगमेक इन महाराष्ट्र ला चालना देण्यासाठी जपानचे योगदान,राज्यातील पायाभूत सुविधा क्षेत्रातील गुंतवणूकस्मार्ट सिटी प्रकल्प,विद्यार्थी आदान- प्रदान योजना आदींबाबत करार व्हावेत अशी अपेक्षा श्री. रावल यांनी यावेळी व्यक्त केली.
                हिरोयुकी त्सुई यांनी महाराष्ट्र दौऱ्यात मिळालेल्या अगत्याबद्दल विशेष आनंद व्यक्त केला. विद्यार्थी आदान- प्रदान तसेच ज्ञान आदान प्रदान हा दौऱ्याचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले. तसेच वाकायामा गव्हर्नर यांच्या दौऱ्यात राज्य शासनाकडील विविध क्षेत्रांच्या अपेक्षासंदर्भात चर्चा करण्यात आली. शिष्टमंडळात शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधींचा समावेश असल्याने त्यांचे पुणे तसेच मुंबईतील शाळांना दिलेल्या भेटीसंदर्भातीलतेथील शिक्षण पद्धतीविषयीचे अनुभवांवरही चर्चा करण्यात आली.
                शिष्टमंडळातील सदस्यांना पर्यटनमंत्र्यांनी हिमरु शाल तसेच अजिंठा लेण्यातील छायाचित्रांच्या फोटो कॉपीज भेट दिल्या.

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111

    Comments

    No comments yet. Why don’t you start the discussion?

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *