👁 11 Views

पंढरपूर-चैताली फाळके मृत्यु प्रकरण… उच्च न्यायालयानेही फेटाळला चैतालीच्या सासुचा अटकपुर्व जामीन अर्ज..!

  • गणेशोत्सवानिमित्त  सर्वांना हार्दिक शुभेच्छा..! मोरया..!!
  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
पंढरपूर Live 3 september  2017 
पंढरपूर (प्रतिनिधी):- यात हकीकत अशी की, दि. 13/07/2017 रोजी पंढरपूरमधील मयत चैताली अभिजीत फाळके हिचा तिरंगा नगर येथील राहत्या घरी संशयास्पद मृत्यु झाला होता. याप्रकरणी मयताचे वडील यांनी पंढरपूर शहर पोलिस स्टेशन येथे पती अभिजीत वसंत फाळके व सासु शोभा वसंत फाळके यांच्या विरुध्द फिर्याद दिली होती. तद्नंतर दि.28/07/2017 रोजी त्यांनी पुरवणी जबाबामध्ये सासरा वसंत नरहरी फाळके, दीर विश्‍वजीत वसंत फाळके व नणंद ऐश्‍वर्या उर्फ स्नेहल वसंत फाळके हे ही माहेरहून पैसे आणण्यासाठी चैतालीचा छळ करत होते. व सारखा मानसीक व शारिरीक छळ करीत होते. अशा स्वरुपाचा पुरवणी जबाब त्यांनी दिला होता. याप्रकरणी सदर आरोपींवरती  हुंडाबळी या कलमाची नव्याने वाढ झाली होती. 
याप्रकरणी यातील आरोपी क्रमांक दोन शोभा वसंत फाळके हिने पंढरपूर येथील सत्र न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी वकीलांमार्फत अर्ज दाखल केला होता. सरकारी वकील अ‍ॅड.सारंग वांगीकर यांनी हा गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. यातील आरोपी शोभा वसंत फाळके ही गुन्हा घडला तेंव्हा घटनास्थळी होती.’’ व इ. युक्तीवाद केला. तर मुळ फिर्यादीचे वकील अ‍ॅड. शशी कुलकर्णी व अ‍ॅड. ओंकार बुरकुल यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले की, चैतालीची आत्महत्या नसून शांत डोक्याने तिची पुर्वनियोजित हत्या झालेली आहे. राजकीय दबावापोटी ही हत्या अतिशय हुशारीने आत्महत्या आहे असा बनाव केलेला आहे.’’ यावेळी मुळ फिर्यार्दीचे वकिलांनी कांही महत्वाची कागदपत्रे सादर करुन आरोपीच्या अटकपूर्व जामीनास तीव्र विरोध केला. व वेळोवेळी मयताच्या वडीलांनी अभिजीत फाळके यांच्या खात्यावर पैसे भरल्याच्या पावत्या मे. कोर्टाच्या रेकॉर्डवर आलेल्या आहेत. या प्रकरणी मे.कोर्टाने या सर्व बाबींचा विचार करुन व सरकारी वकील अ‍ॅड. सारंग वांगीकर व मुळ फिर्यादीचे वकील अ‍ॅड. शशी कुलकर्णी व अ‍ॅड. ओंकार बुरकुल अ‍ॅड. स्वप्नील सरवदे यांचा युक्क्तीवाद ग्राह्य धरुन पंढरपूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिनंदन पाटांगणकर यांनी आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला. या निकालाच्या विरोधात मयत चैतालीची सासु आरोपी शोभा फाळके हिने अ‍ॅड. एम.एस. मोहिते यांच्या वतीने उच्च न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. तो जामीन अर्ज सरकारी वकील एस.एस. कौशीक यांचा युक्तीवाद ग्राह्य धरुन मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला आहे.
या प्रकरणी सासु शोभा वसंत फाळके, सासरा वसंत नरहरी फाळके, नणंद ऐश्‍वर्या उर्फ स्नेहल वसंत फाळके हे तिघेही अद्याप फरार आहेत. मयताच्या कुटूंबियांनी खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी सोलापूर ग्रामीण चे पोलिस अधिक्षक विरेश प्रभु व पंढरपूर उपविभागीय पोलिस अधिकारी निखील पिंगळे यांचेकडे केली आहे. या प्रकरणाच्या बर्‍याचशा बाबी संशयास्पद आहेत. 
 याप्रकरणी अद्याप फरार असणारे आरोपी वसंत नरहरी फाळके व स्नेहल उर्फ ऐश्‍वर्या फाळके यांनी अटकपुर्व जामीनासाठी पंढरपूर जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. याप्रकरणी सुनावणी दि. 6 सप्टेंबर 2017 रोजी होणार आहे. तसेच यातील अटकेत असलेला आरोपी विश्‍वजीत वसंत फाळके यांनी पंढरपूर येथील जिल्हा सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केलेला आहे. याप्रकरणी आरोपीच्या वकीलांचा युक्तीवाद पुर्ण झालेला आहे. तर सरकारी वकीलांचा युक्तीवाद पुर्ण होण्यासाठी दि. 6 सप्टेंबर 2017 ही तारीख न्यायालयाने नेमलेली आहे. या प्रकरणी सरकारतर्फे अ‍ॅड.सारंग वांगीकर, मुळ फिर्यादीतर्फे अ‍ॅड. शशी कुलकर्णी, अ‍ॅड. ओंकार बुरकुल तर आरोपीतर्फे अ‍ॅड. प्रशांत उंडाळे हे काम पाहत आहेत.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान वानखेडे संपर्क- 8308838111 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *