- गणणपती बाप्पा मोरया..! पुढच्या वर्षी लवकर या. .!!
- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 5 september 2017
तुळजापूर –येथील तुळजाभवानी मंदिरात दर्शनाला सोडण्याच्या मागणीसाठी स्थानिक महिलांनी तुळजाभवानी देवीच्या मुख्य महंतांनाच अडविल्याची घटना सोमवारी (दि. ४) पहाटे घडली.
यामुळे मंदिर उघडण्यास उशीर झाला. परिणामी तुळजाभवानी मातेच्या चरणतीर्थ पूजेला अर्धा तास विलंब झाल्याचे समजते. तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी स्थानिकांना थेट सोडण्याचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. दुसरीकडे या गोंधळामुळे शेकडो बोगस ओळखपत्रांचा विषयही चव्हाट्यावर आला असून मंदिर संस्थान याप्रकरणी कोणती भूमिका घेते, याकडे लक्ष लागले आहे.
सोमवारी पहाटे नेहमीप्रमाणे महंत तुकोजीबुवा प्रक्षाळ पूजेसाठी तुळजाभवानी मंदिराचे प्रमुख दरवाजे उघडण्यासाठी आले. त्यावेळी स्थानिक महिलांनी दिव्यांगासाठींच्या गेटजवळ त्यांना अडविले. यावेळी महिलांनी चरणतीर्थ पूजेसाठी सोडण्याची मागणी करीत महंतांना मंदिर उघडण्यास मज्जाव केला. सुमारे अर्धा तास हा गोंधळ सुरू होता. त्यामुळे मंदिरात सोमवारी पहाटे तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याचे समजते.
दरम्यान सुरक्षा रक्षकांनी घटनेची वरिष्ठांना दूरध्वनीवरून माहिती दिली. यावेळी केवळ अधिकृत ओळखपत्र असणाऱ्या महिलांना सोडण्याची परवानगी देण्यात आली.
शेकडो बोगस ओळखपत्र
दरम्यान,येथील तुळजाभवानी मंदिरात चरणतीर्थ पूजेसाठी महिला आणि २० पुरुष, अशा केवळ २७ जणांना अधिकृत ओळखपत्र आहेत. मात्र, अशाप्रकारचे जवळपास २०० पेक्षा अधिक अनाधिकृत ओळखपत्र असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, सूत्रांनुसार मोठ्या प्रमाणातील बनावट ओळखपत्रांमुळेच ही समस्या निर्माण झाल्याचे समजते. तत्कालीन जिल्हाधिकारी प्रवीण गेडाम यांच्या कार्यकाळात पाच वर्षांपूर्वी ओळखपत्र देण्यात आली आहेत.
तुळजाभवानी मातेच्या मुख्य गाभाऱ्यातील घडामोडींवर सकाळच्या चरणतीर्थ पूजेपासून ते सायंकाळी मंदिर बंद करतानाच्या प्रक्षाळ पूजेपर्यंतच्या प्रत्येक धार्मिक विधीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे. १५ दिवसांपासून हा प्रकार सुरू असून यासाठी मंदिर संस्थानने एक अधिकारी एका कर्मचाऱ्याची नेमणूक केली आहे. याद्वारे तुळजाभवानी देवीच्या गाभाऱ्यात विनाकारण ये-जा करणाऱ्या पुजारी सेवेकरी तसेच कर्मचाऱ्यांचीही नोंेद घेतली जात असल्याचे कळते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


