- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 6 september 2017
सुपरस्टार अजीत सध्या जोरात आहे. केवळ अजीतच नाही तर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा सुद्धा जोरात आहे. होय, उण्यापु-या ११ दिवसांत अजीत व विवेकच्या ‘विवेगम’ या चित्रपटाने ‘बाहुबली’चा विक्रम मोडीत काढला आहे.
सुपरस्टार अजीत सध्या जोरात आहे. केवळ अजीतच नाही तर बॉलिवूड अभिनेता विवेक ओबेरॉय हा सुद्धा जोरात आहे. होय, उण्यापु-या ११ दिवसांत अजीत व विवेकच्या ‘विवेगम’ या चित्रपटाने ‘बाहुबली’चा विक्रम मोडीत काढला आहे. विश्वास बसत नाहीयं ना? पण हे खरे आहे.‘विवेगम’ रिलीज होऊन केवळ ११ दिवस झाले आणि या ११ दिवसांत या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर धमाकेदार कमाई केली आहे. यंदाचा सर्वांत मोठा ब्लॉकबस्टर ‘बाहुबली2’च्या बॉक्सआॅफिस रेकॉर्डला ‘विवेगम’चांगलीच टक्कर देताना दिसतोय.
गत २५ आॅगस्टला हा चित्रपट रिलीज झाला. यानंतर केवळ तीन ते चार दिवसांत हा चित्रपट १०० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला होता. ११ व्या दिवशी या चित्रपटाने वर्ल्डवाईड १५२ कोटींचा गल्ला जमवला. केवळ चेन्नईबद्दल बोलायचे झाल्यास ‘विवेगम’ने ‘बाहुबली’ला मागे टाकले आहे. आत्तापर्यंत ‘विवेगम’ने चेन्नईत ८.५० कोटींची कमाई करत ‘बाहुबली’ला मागे टाकले. कारण ‘बाहुबली’ने चेन्नई बॉक्सआॅफिसवर केवळ ८.२५ कोटींची कमाई केली होती. ‘बाहुबली’ने चेन्नईत तीन दिवसांत केवळ ३.२४ कोटी कमावले होते. पण अजीतच्या या चित्रपटाने तीन दिवसांत ४.२८ कोटींचा गल्ला जमवला आहे. ‘विवेगम’चे ओपनिंग डे कलेक्शन ३३.०८ कोटी होते. म्हणजेच ‘विवेगम’ने रजनीकांतच्या ‘कबाली’चा ओपनिंग डे रेकॉर्डही मोडीत काढला आहे.जीएसटी लागू झाल्यानंतर ‘विवेगम’ हा साऊथचा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट बनला आहे. पहिल्या आठवड्यात चित्रपटात वर्ल्डवाईड १०६ कोटी कमावले होते. अद्यापही चित्रपटाची घोडदौड सुरु आहे. यावरून ‘विवेगम’ने प्रेक्षकांना कसे वेड लावलेय, याचा अंदाज तुम्ही बांधू शकता.
जगभरातील ३००० हजार स्क्रीन्सवर रिलीज झालेल्या या चित्रपटात अजीत कुमारशिवाय विवेक ओबेराय, अक्षरा हासन व काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत आहेत.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

