- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 7 september 2017
ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालयाच्या साहित्य पुरस्काराचे वितरण
प्रतिनिधी खेड़भाळवणी
कै.कुबेर पवार सर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ देण्यात येणारे ज्ञानवर्धिनी सार्वजनिक वाचनालय खेडभाळवणी (ता.पंढरपूर) यांच्यावतीने देण्यात येणारे साहित्य पुरस्कार खेड़भाळवणी येथे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत सर यांचे शुभहस्ते देण्यात आले.यावेळी व्यासपीठावर आरोग्य विभाग सोलापुरचे सहाय्यक संचालक डॉ.अभिमन्यु खरे,संचालक समाधान काळे, साहित्यिक शिवाजीराव बागल, प्राचार्य आर.डी.पवार, डॉ.दादासाहेब साळुंखे, संचालक बिभीषण पवार, संचालक मोहन नागटीळक, तंटामुक्ति अध्यक्ष भारत साळुंखे, आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी समाजसेवेसाठी पंढरपुरचे समाजसेवक संजय भैया शहा यांना समाजसेवा पुरस्कार देवून गौरविण्यात आले.साहित्यामध्ये नाशिकचे रावसाहेब जाधव(ढेकुळ),उस्मानाबादचे डी.के.शेख (दंगल), मिरजचे सचिन पाटील (अवखाळी विळखा), इचलकरंजी येथील अमृता कदम (तुलाही जगायचय), तर बुलढाणा येथील संदीप गवई (पिवळ्या बाभळी) यांना साहित्य पुरस्कार देवून गौरविण्यात आले.
यावेळी बोलताना आमदार दत्तात्रय सावंत म्हणाले, साहित्य हा समाजाचा आरसा आसतो, साहित्य माणसाला जगायला शिकवते. यावेळी साहित्यिक शिवाजीराव बागल, संचालक समाधान काळे, प्राचार्य आर.डी.पवार, डॉ.दादासाहेब साळुंखे आदींनी आपली मनोगते व्यक्त केली. यावेळी निमंत्रित कविंचे काव्यसमेल्लन पार पडले. तसेच यावेळी महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीची बैठक संपन्न झाली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक हेमंत पवार, सूत्रसंचालन साहित्यिक अंकुश गाजरे, तर आभार प्रा. राजेश पवार यांनी मानले.कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य शाळा कृती समितीचे सर्व पदाधिकारी ,साहित्य रसिक , व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे

