👁 9 Views

मोहिते-पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे लोणंद-पंढरपूर रेल्वे मार्गाच्या कामाला आला वेग..!

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 11 september  2017 
लोणंद-फलटण-पंढरपूर या रेल्वे मार्गाच्या सर्व्हेला सुरुवात झाली आहे़ याबाबत खा़ विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कामाला गती आल्याचे भारतीय रेल्वे पुणे येथील सर्वेअर मुकुंद खिलारी यांनी सांगितले़
अधिक माहिती देताना मुकुंद खिलारी म्हणाले, पंढरपूर-फलटण रेल्वे मार्गाचा सर्व्हे जी़ पी़ एस़ म्हणजेच ग्लोबल पोझिशन सिस्टीमद्वारे केला जातो़ या सिस्टीममुळे सॅटेलाइटवरून ज्या भागाचा सर्व्हे चालू आहे तेथील चढ, उतार व सर्व भौगोलिक परिस्थितीची माहिती कार्यालयात कळते़ त्या माहितीच्या आधारे रेल्वेलाईन नकाशा तयार केला जातो़ यापूर्वी इंग्रजांच्या काळात या रेल्वे मार्गाचा सर्व्हे झाला होता, परंतु तो सर्व्हे नॅरोगेजचा झाला होता़.

 आता हा ब्रॉडगेज रेल्वे मार्ग होणार आहे़ त्यामुळे पुन्हा सर्व्हे काम चालू केले आहे़ फलटणपर्यंतच्या सर्व्हेचे काम पूर्ण झाले आहे़ पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील सर्व्हेचे काम अंतिम टप्प्यात आहे़ त्यामुळे वर्षभरात प्रत्यक्ष रेल्वे मार्गाच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे मुकुंद खिलारी यांनी सांगितले़ 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *