👁 9 Views

बँकांनी कर्जमाफीसाठीची माहिती 15 सप्टेंबरपर्यंत द्यावी

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 12  september  2017 

मुंबईदि. 12 : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर 2017 असून या मुदतीच्या आत सर्व शेतकऱ्यांनी अर्ज भरावेत. बँकांनी सुद्धा 15 सप्टेंबर 2017 पर्यंत कर्जमाफीसाठीची सर्व माहिती विहित नमुन्यात माहिती व तंत्रज्ञान विभागाला उपलब्ध करुन द्यावीअशा सूचना मंत्रालयात सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली कर्जमाफीसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत करण्यात आल्या.
आजपर्यंत 44 लाख 21 हजार 655 शेतकरी कुटुंबांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यांतील बँकांची बैठक घेऊन 15 सप्टेंबर 2017 पर्यंत कर्जमाफीसाठी लागणारी सर्व माहितीमाहिती व तंत्रज्ञान विभागाला देण्याच्या सूचना द्याव्यात. तसेच बँकांकडून संपूर्ण माहिती उपलब्ध झाल्यानंतर माहिती तंत्रज्ञान विभागाने तपासणी करावी. ही तपासणी पूर्ण झाल्यानंतर सदर योजनेचा लाभ मिळण्यास पात्र ठरतील अशा शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात कर्जमाफीची रक्कम जमा करण्याची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले. तसेच कर्जमाफीच्या प्रक्रियेला गती देण्यासाठी पालक सचिवांनी लक्ष द्यावेअशा सूचनाही या बैठकीत देण्यात आल्या.
            यावेळी महसूल मंत्री चंद्रकांत पाटीलवित्त मंत्री सुधीर मुनगंटीवारकृषीमंत्री पांडुरंग फुंडकरपरिवहन मंत्री दिवाकर रावते,जलसंपदा मंत्री गिरीष महाजनसहकार विभागाचे अपर मुख्य सचिव एस. एस. संधूकृषी विभागाचे प्रधान सचिव विजय कुमार यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *