👁 9 Views

वृक्ष लागवडी करणे काळाची गरज पण त्यांचे संवर्धन करणे गरजेचे-पै.मुरलीधर मुंडे

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 12  september  2017 


परळी वैजनाथ (प्रतिनिधी) ः- वृक्ष लागवड करण्याबरोबरच त्याचे संवर्धन करणे अत्यंत गरजेचे असे प्रतिपादन महाराष्ट्र कुस्तिगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांनी केले. 
पै.राजाभाऊ दगडु मुंडे यांची मुलगी कु.पुजा हिच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त आयोजित कुस्तिगीर परिषदेचे तालुकाध्यक्ष मुरलीधर मुंडे यांच्या हस्ते वृक्षलागवड करण्यात आली तेंव्हा  कार्यक्रमात ते बोलत होते.  झाडे लावल्याने भविष्यात पाऊस पडेल असा संदेश पावसा ये घरोघरी, झाडे लावा घरोघरी यातून देण्यात आला. या वेळी मुंडे म्हणाले की, वृक्ष आपले सखेसोबती आहेत. आज मोठया प्रमाणात वृक्षतोड होत असल्याने जमिनीची धूप होत आहे. अवेळी पावसाचे आगमन वातावरणातील प्राणवायू संपुष्टात येत आहे. भविष्यात अशीच परिस्थिती राहिल्यास अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. प्रत्येकाने वृक्षारोपण करणे ही काळाची गरज बनली आहे. ही गरज ओळखून रोपाची लागवड करून त्याचे संगोपन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. 
यावेळी  जयहिंद प्रतिष्ठानचे अध्यक्ष भागवत मुंडे, ज्येष्ठ पै.दगडु मुंडे,रामराव मुंडे, पप्पु मुंडे, मेघराज मुंडे, किसन मुंडे, श्रीराम मुंडे, रमेश मुंडे, रावसाहेब मुंडे, वैजनाथ मुंडे, राजाभाऊ मुंडे, बालासाहेब मुंडे, गोविंद मुंडे, पप्पु बनसोडे, आदी उपस्थित होते. यावेळी आंबा, चिकू, पेरु, डाळींब, जांब, बदाम, शेवगाव, लिंब, वड, पिंपळ, पिंपरण, कडूनिंब, सिताफळ, बांबू, बेल, जांभुळ, करंज इत्यादी रोपे लावण्यात आली. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *