- 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी संपर्क
- मुख्य संपादक– भगवान वानखेडे
- Whatsup- 8308838111 Mobile-8552823399
- mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
- कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
सोलापूर विद्यापीठाला पुण्यश्र्लोक आहिल्यादेवी होळकर विद्यापीठ नाव देण्यासाठी 28 ऑक्टोबर रोजी धनगर समाजाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर महामोर्चा काढण्यात आला होता. अक्लक्कोट तालुक्यात असलेल्या धनगर समाजाची ताकद पाहुन आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी धनगर समाजाच्या मोर्चाला जाहिर पाठींबा देत ते मोर्चा मध्येही सामील झाले. परंतु 18 सप्टेंबर रोजी लिंगायत समाजाच्या वतीनं काढण्यात येणार्या मोर्चातही आमदार सामिल झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. अक्लक्कोट तालुक्यात धनगर समाजाची संख्या निर्णायक आहे. त्यामुळे विद्यापीठ नामांतरामध्ये धनगर समाज बांधवच्या भावनांशी खेळ करत धनगर समाजाची फसवणूक करणार्या आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांना आगामी विधानसभा निवडणुकीत धनगर समाज बांधव त्यांना त्यांची जागा दाखवतील अंस सभागृह नेते सुरेश पाटील म्हणाले.
जगभरात देव देवतांची नांवे कुठल्याही विद्यापीठाला दिल्याचे पहावयास मिळत नाही. सिद्धारामेश्वर हे सोलापूरचे ग्राम दैवत आहे आम्हालाही आमच्या ग्रामदैवताचा अभिमान आहे. परंतु सोलापूरशी कसलाही संबध नसणारा मनोहर धोंडे नावांचा व्यक्ती विद्यापीठ नामांतराच्या नावा खाली आपली पोळी भाजून घेत धनगर समाज आणि लिंगायत समाजामध्ये दुफळी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे या मनोहर धोंडेला सोलापूरकर त्यांची जागा दाखवतील. असेही सुरेश पाटील म्हणाले.
पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अॅन्ड्रॉईड अॅप.. !
सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय! पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!
कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर
मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे


