👁 7 Views

स्वेरीत उद्या होणार ‘ऑलंम्पस २०१७’चे उदघाटन

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13  september  2017 

देशातील संशोधक स्पर्धकांची उपस्थिती राहणार
पंढरपूर- राष्ट्रीय दर्जाचे स्पर्धात्मक ऑलंम्पस २०१७ या कार्यक्रमाचे उद्या शुक्रवार, (दि.१५ सप्टेंबर) रोजी उदघाटन होणार असून याचे प्रख्यात लेखक व आय.आय.टी मुंबई मधील केमिकल इंजिनीअर प्रा. अच्च्युत गोडबोले यांच्या हस्ते उदघाटन होणार असल्याची माहिती संस्थेचे संस्थापक सचिव व प्राचार्य डॉ. बी.पी.रोंगे यांनी दिली.
        येथील श्री विठ्ठल एज्युकेशन अॅण्ड रिसर्च इन्स्टिटयूट,पंढरपूर संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयात उद्यापासून दोन दिवस अर्थात दि १५ व १६ सप्टेंबर या दोन दिवशी राष्ट्रीय दर्जाचे स्पर्धात्मक ऑलंम्पस २०१७  ही स्पर्धा होत असून याची तयारी अंतिम टप्यात आली असल्याचे चित्र दिसत आहे. स्वेरीचे सचिव व प्राचार्य डॉ.रोंगे यांच्या दिशादर्शक व नियोजनात्मक मार्गदर्शनाखाली तसेच कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डी.टी काशीद यांच्या सहकार्याने संपूर्ण स्पर्धेची तयारी होत आहे. यासाठी जवळपास भारतभरातून स्पर्धक येत असतात. त्यामुळे त्यांच्या निवासापासून ते भोजनाची सोय देखील अंतिम टप्यात आली आहे. ऑलंम्पस २०१७  हा कार्यक्रम सर्व विभागासाठी असून यामध्ये रोबो रेस,लेथ वॉर,अॅरो मॉडेलिंग, कास्ट स्टील वॉर, अॅटो कॅड रेस, कटीया रेस, टेक्नो मेक वॉर,पेपर फिस्ट, विझ ओ टेक, डॉक्युमेंटरी, बिझनेस प्लान, कॅट मॅट अॅबिलिटी, पिकासा, सीआरपी, अॅड झिप, फॅब्रिका, ब्रिज डिझाईन, कॅड रेस, सुरेव हंट, सर्किट सुडोकू, रोबोवॉर, ब्लाइंड सी,वेब डिझाईन, अँड्रॉइड अॅप, लॅटिन प्लॅनेट, कोड डेबुगिंग, अॅनिमेशन असे विविध प्रकारचे संशोधन स्पर्धा होणार आहेत. या संशोधनावर आधारित स्पर्धेला दरवर्षी प्रचंड प्रतिसाद मिळतो. त्यामुळे याच्या संपूर्ण तयारीवर प्राचार्य डॉ. रोंगे हे बारीक लक्ष ठेवून असतात त्यामुळे संपूर्ण संशोधन समितीचे यावर नियंत्रण असते. नियोजनात्मक स्पर्धा होण्यासाठी विविध समित्यांद्वारे विभागवार कामे सुरु आहेत. बाहेरून आलेल्या संशोधक स्पर्धकांना कोणतीही अडचण येवू नये यासाठी सर्वजण परिश्रम घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या वतीने ऑलंम्पस २०१७ चे विद्यार्थी सचिव गणेश सुरवसे, खजिनदार समर्थ उपळकर, कोमल पाटील, सहसचिव आदेश मनगिरे, अध्यक्षा मृणालिनी माने यांच्यासह इतर विद्यार्थी देखील परिश्रम घेत असून या स्पर्धात्मक कार्यक्रमाच्या अधिक माहितीसाठी प्रा. एस.एम काळे (मोबा. नं- ९१६८६५५३४४), प्रा. आर.जी साचे (मोबा. नं- ९१७५६८७८२८), प्रा.एम.ए. देशमुख (मोबा. नं-९९७०२७७१५०) व गणेश सुरवसे (मोबा.नं-९९२२१०९१२२ ) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन यावेळी करण्यात आले.
छायाचित्र- १. ऑलंम्पस २०१७ च्या कार्यक्रमाचे उदघाटक प्रख्यात लेखक व आय.आय.टी मुंबई मधील केमिकल इंजिनीअर प्रा. अच्च्युत गोडबोले व प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे. २. ऑलंम्पस २०१७ पोस्टर.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *