👁 10 Views

शेतकर्‍यांची लुट थांबविली नाही तर विठ्ठलाच्या चरणाखालच्या विटेने मस्तक फोडू शेतकर्‍यांसोबत होत असलेली बेईमानी खपवून घेणार नाही..! पंढरीत ‘गर्जले’ आमदार बच्चू कडू

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 13  september  2017 
शेतकर्‍यांची लुट होत आहे. मात्र सरकार शांतपणे सारे बघत आहे. या सरकारला विठ्ठलाची सुध्दा भीती उरली नाही. आम्ही विठ्ठलाच्या चरणावर नतमस्तक होतो. त्यावेळी कायम त्याच्या चरणाखालची विट सुध्दा पाहतो. शासनाने शेतकर्‍यांची होणारी लुट थांबवली नाही तर याच विटेने मस्तक फोडू..! असा इशारा आ.  बच्चू कडू यांनी आज पंढरीत दिला. शेतकर्‍यांसोबतची बेईमानी कदापीही खपवून घेतली जाणार नाही. असेही ते म्हणाले. 
केंद्राला रामदेव बाबा पेक्षा शेतकरी मोठा वाटत नाही. जिल्हा दुध संघाने 3/6/8/4 मध्ये शेतकर्‍यांना अडकवून त्यांची लूट केली आहे. निपटार्‍याचे पैसे व्याजासहित शेतकर्‍यांच्या खात्यावर जमा झाले पाहिजेत. अन्यथा अध्यक्षांसह संचालक मंडळांवर चोरीचा गुन्हा दाखल करण्यात येईल. असा इशाराही यावेळी त्यांनी दिला.
प्रहार संघटनेच्यावतीने विविध मागण्यांसाठी शिवाजी चौक ते तहसिल कार्यालयापर्यंत मोर्चा काढून तहसिल आवारात डेरा आंदोलन करण्यात आले. यावेळी पश्‍चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख अतुल खूपसे, जिल्हा अध्यक्ष दत्ता मस्के, अमोल जगदाळे, नितिन बागल, मच्छिंद्र गोरड, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संदिप मांडवे, स्वाभिमानचे जिल्हाध्यक्ष समाधान फाटे, मनसेचे तालुकाध्यक्ष शशिकांत पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी तहसिलदार मधूसुदन बर्गे यांच्या दालनामध्ये दुध संघाचे अधिकारी व आ. कडू यांच्यामध्ये बैठक झाली. 
या आंदोलनाला मोठ्या संघटनेने शेतकरी, अपंग बांधव व विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी प.म.संपर्क प्रमुख अतुल खूपसे यांच्यासह अनेकांनी आपले मनोगत व्यक्त करीत सरकार व शासनाला निर्वाणीचा इशारा दिला.

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *