👁 9 Views

पंढरीतील दिपक अन्नदाते हा युवक घेणार जैन मुनी दीक्षा..! पंढरीतील सर्वप्रथम युवक जैन मुनी दीक्षा घेणारा म्हणून होणार नोंद..!

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
पंढरपूर Live 14  september  2017 

पंढरपूर (प्रतिनिधी):- पंढरीतील इतिहासात प्रथमच येथील एक युवक जैन मुनीची दीक्षा घेणार आहे. येथील दिपक चंद्रप्रभु अन्नदाते हा युवक जैन मुनीची दीक्षा घेणार आहे. पंढरीतील ‘सर्वप्रथम जैन मुनीची दीक्षा घेणारा युवक’ म्हणून त्यांची नोंद होणार आहे. 
पंढरपूर येथील जैन समाजाचे युवक धर्मप्रेमी, धर्मानुरागी चंद्रप्रभु अन्नदाते व सौ.मंगल अन्नदाते यांचे सुपूत्र चंद्रप्रभु अन्नदाते हे बालपणापासून धर्मसंस्कारात वाढलेले आहेत. बालब्रम्हचारी दिपक अन्नदाते यांचे गेली चार वर्ष प.पू.चर्या शिरोमणी 108 विशुध्द सागर महाराज यांच्या सान्निध्यामध्ये धर्मशिक्षण पुर्ण झाले आहे. आत्मीक कल्याणासाठी इंदौर येथे इतर सात दीक्षार्थी बा. ब्र. शिवम भैया, बा. ब्र.भरत भैया, बा. ब्र.रोहित भैया, बा. ब्र.आशिष भैया, बा. ब्र.अतुल भैया, बा. ब्र.अमित भैया यांना दिगंबर साधु बनण्याची दीक्षा ऑक्टोबर महिन्यात देण्यात येणार आहे याच वेळी पंढरीतील दिपकभैया हे सुध्दा दीक्षा घेणार आहेत. हे बालब्रम्हचारी दीक्षापुर्व कार्यक्रमासाठी पंढरपूर नगरीमध्ये दि. 15 सप्टेंबर रोजी येणार असून त्यांच्या स्वागत कार्यक्रमासाठी पंढरी नगरीतील सकल जैन समाज सज्ज झाला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने दि. 16 सप्टेंबर रोजी त्यांची पंढरीत भव्य दिव्य मिरवणुक सांजश्रृंगार सहीत अन्नदाते यांच्या अनिलनगरमधील घरापासून फडे दिगंबर जैन मंदिर महावीर नगर येथे येणार आहे. त्यानिमित्ताने भगवंतांचा अभिषेक प.पु. आर्यिका शांतमती माताजी यांचे प्रवचन होणार असून सदरच्या आठ दीक्षार्थींना जैन धर्मातील धर्मप्रेमींकडून (गोदभरी) दान दिले जाणार आहे. 
दिपक अन्नदाते यांना वैराग्याची प्रेरणा देण्यासाठी प.पू. एैलक नम्रसागर महाराज (मध्यप्रदेश) तसेच प.पु. 105 सुशीलमती माताजी, सुब्रता माताजी व आर्यिका शांतमती माताजी यांच्याकडून धर्मशिक्षण व प्रेरणा त्यांना मिळालेली आहे. दिपक भैया यांचे माता-पिता नेहमी जैन साधु आणि साध्वी यांच्या सेवेसाठी तत्पर असतात. दिपक भैया हे अत्यंत गरीब कुटूंबातील जन्मलेले रत्न असून त्यांनी भगवान महावीर यांचा मार्ग अनुसरुन आत्मीक कल्याणाचा निर्नय घेतला आहे. सर्व जैन बांधवांकडून त्यांचे कौतुक होत आहे. सदर कार्यक्रमासाठी सर्व जैन बांधवांनी मोठया संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे. 

पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *