👁 6 Views

पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी येथे भीमा नदीच्या बंधाऱ्यावरून पती पत्नी गेले वाहून… तालुका पोलीसांचे शोधकार्य सुरू..!

  • 11 लाख दर्शकांच्या पसंतीस पात्र ठरलेले पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात देणेसाठी  संपर्क  
  • मुख्य संपादक– भगवान वानखेडे    
  • Whatsup- 8308838111 Mobile-8552823399  
  • mail-livepandharpur@gmail.comweb – http://www.pandharpurlive.com
  • कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक,पंढरपूर गोपाळपूर रोड, पंढरपूर
  • पंढरपूर Live 14  september  2017 
    पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी येथे भीमा नदीच्या बंधाऱ्यावरून पती पत्नी गेले वाहून… तालुका पोलीसांचे शोधकार्य सुरू..!


    पंढरपूर :- पंढरपूर तालुक्यातील मुंडेवाडी येथिल बंधाऱ्यावरुन पाणी वाहत असतानाही सांगोला तालुक्यातील  पती पत्नी दुचाकीवरून जात असताना भीमा नदीत वाहून गेल्याची घटना घडली आहे. 
    आज गुरुवार दि. 14 सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ च्या दरम्यान ही दुर्घटना घडली.

    याबाबत पंढरपूर तालुका पोलिसांकडून समजलेली हकीकत अशी की, सांगोला येथील सुरेश बनकर आणि त्यांच्या पत्नी सौ. वंदना बनकर हे दुचाकीवरून पंढरपूर तालुक्यातील फुलचिंचोली येथे वंदना यांच्या आजारी मावशीला भेटण्यासाठी गेले होते . संध्याकाळी ७ च्या सुमारास ते अनवली गावाला जाण्यासाठी निघाले . परंतु बंधाऱ्यावरुन जात असताना पाण्याच्या वेगाचा अंदाज न आल्याने त्यांनी दुचाकीवरून या बंधाऱ्यावरुन जाताना हा अपघात घडला.


    अनवली हे सौ. वंदना यांचे माहेर होते . रात्रीचा मुक्काम माहेरी करुन हे दांपत्य सकाळी सांगोल्याला आज आपल्या घरी जाण्यासाठी निघाले होते. भीमा नदीत उजनी धरणातुन ४० हजार क्यूसेकचा विसर्ग भीमेत सोडल्याने नदीवरील सर्व बंधारे पाण्याखाली गेले आहेत. मुढेवाडी बंधाऱ्यावर देखील पाणी आल्याने दुचाकीवरुन जाणारे बनकर दांपत्य वाहून गेले असुन स्थानिकांनी मदतकार्य सुरु केले आहे पण अंधार पडल्याने अडचणी निर्माण होत आहेत . पंढरपूर  तालुका पोलिसांकडून शोधकार्य सुरू आहे. 

    पंढरीचे पहिले लोकप्रिय ई-न्युज वेब चॅनल व अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅप.. !

    सर्वात जलद, सर्वात लोकप्रिय!  पंढरपूर Live वर आपल्या व्यवसायाची जाहिरात द्या..अल्पदरात!!

    कार्यालय:- कालिका देवी मंदिरा जवळ, संत रोहिदास चौक, पंढरपूर गोपाळपूर रोड, तालुका क्रीडा कार्यालयासमोर, पंढरपूर

    मुख्य संपादक-भगवान गणपतराव वानखेडे 

Comments

No comments yet. Why don’t you start the discussion?

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *